मै भी चौकीदार म्हणजे “मोदी बाबा और ४० चोर ” : काँग्रेस

Advertisements
Advertisements
Spread the love

काँग्रसने भारतीय जनता पार्टीच्या मै भी चौकीदार या सोशल मिडीयावर कॅम्पेनवर जोरदार निशाणा साधला आहे. काँग्रेसचेप्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेत सध्या देशभरात चौकीदाराची चोरी चर्चेचा विषय बनली आहे. मोदी बाबा आणि त्यांच्या ४० चोरांनी नावापुढे चौकीदार शब्दाचा वापर करुन देशाला लुटण्याचं काम करत आहेत अशी टीका केली.

सुरजेवाला यांनी सांगितले की, मोदींचा ब्रँड अयशस्वी ठरल्यानंतर आता मै भी चौकीदार असा नवं कॅम्पेन भाजपकडून सुरु करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी यांचे अपयश लपविण्यासाठी असा पद्धतीचा सोशल मिडीयाचा वापर केला जात आहे. प्रत्येक वर्षाला मोदी स्वत:च्या घोषणा बदलून नवीन घोषणा आणत असतं. मात्र मोदींची फसवी आश्वासने आता लोकांना कळू लागली आहेत. निवडणुकीत पराभव दिसू लागल्याने मोदी घाबरले आहेत. त्यामुळे त्यांनी मै भी चौकीदार हा नारा समोर आणला आहे. गरिबांकडून पैसे काढायचे आणि श्रीमंतांना द्यायचे हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ढोंगीपणा लोकांसमोर आलेला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!