लोकसभा २०१९ : काॅंग्रेसची ७ जणांची यादी जाहीर, शिर्डीतून भाऊसाहेब कांबळे

काँग्रेस पक्षाने मंगळवारी रात्री उशिरा नऊ उमेदवारांची नावे जाहीर केली असून, यात महाराष्ट्रातील सात उमेदवारांचा समावेश आहे. यवतमाळमधून माणिकराव ठाकरे, दक्षिणमध्य मुंबईतून एकनाथ गायकवाड, नंदूरबारमधून के. सी. पडवी, वर्ध्यातून अॅड. चारूलता टोकस, शिर्डीत भाऊसाहेब कांबळे आणि रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसने आज रात्री उशिरा ही यादी जाहीर केली. मात्र, अकोला, चंद्रपूर आणि रामटेक मतदारसंघातील उमेदवारांची नावं जाहीर न केल्याने सस्पेन्स वाढला आहे. काँग्रेसने या आधीच अकोला मतदारसंघ प्रकाश आंबेडकर यांच्यासाठी सोडण्यात येणार असल्याचं जाहीर केलं आहे. परंतु, आंबेडकरांसोबत आघाडी होऊ न शकल्याने अकोल्यावरून काँग्रेसमध्ये अजूनही संभ्रम आहे.