काळू-बाळूच्या तमाशापेक्षाही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस विचित्र -गिरीश बापट

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे काळू-बाळूचा तमाशा आहे अशी टीका पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी केली आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना गिरीश बापट म्हणाले, देशभरात सध्या निवडणुकांचं वातावरण आहे. अशात अनेक पक्ष सैरभैर झाले आहेत. काँग्रेस देशातील एकमेव पक्ष होता . तेव्हा,त्यांना पर्याय नव्हता.त्यामुळेते निवडून येत असत. नंतरच्या काळात छोटे छोटे पक्ष एकत्र यायचे आणि त्यांच्या विरोधात लढायचे. आज ७० वर्षांनी या देशात काँग्रेस एवढे वाईट हाल कोणाचेच झाले नाहीत. काँग्रेस सगळ्याना एकत्र करून आपल्या विरोधात लढत आहे.
दोन्ही काँग्रेसवर टीका करताना ते म्हणाले कि , दोन्ही काँग्रेसच काय वर्णन करावं ? यांच्यापेक्षा काळू बाळूचा तमाशा बरा. त्यांच्यात करमणूक तरी होते. हा तमाशा फारच विचित्र आहे.देशात आज राजकीय स्थिती अस्थिर आहे. मागच्या वेळेस पेक्षा जास्त उमेदवार येतील अस विश्वास बापट यांनी व्यक्त केला.एक स्थिर सरकार विकासाच्या दिशेने वाटचाल करणार सरकार आहे. ७० वर्षांमध्ये यांच्या बापाला जमलं नाही, करून दाखवणार आपलं सरकार आहे . आणि प्रगत शेतकऱ्यांच्या आत्महत्या काँग्रेसच्या मागच्या ७० वर्षातील पाप आहे असेही बापट म्हणाले.
पिंपरी-चिंचवड मध्ये आयोजित शिवसेना-भाजप कार्यकर्ता बैठकीत बोलत होते. यावेळी शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे,पालकमंत्री गिरीश बापट,खासदार श्रीरंग बारणे,आमदार बाळा भेगडे,शिवसेना आमदार गौतम चाबुकस्वार,महापौर राहुल जाधव सह सेना भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.