Current News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या …

1. जगभरातील फेसबुक, इन्स्टाग्राम ठप्प : सकाळी गुगल ड्राइव्ह, जीमेल आणि गुगल मॅप्स या सेवांवर परिणाम तर रात्री Facebook Down . फेसबुककडून दिलगिरी
२. काँग्रेसची २१ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर : खुल्या प्रवर्गातील १२ उमेदवार,अनुसुचित जाती प्रवर्गातील ८ आणि अनुसुचीत जमाती प्रवर्गातील एका उमेदवाराचा समावेश. ४ मुस्लिमांनाही उमेदवारी
३. महाराष्ट्रातील नागपूरमधून नाना पटोले, सोलापूरमधून सुशीलकुमार शिंदे, मुंबई उत्तर-मध्यमधून प्रिया दत्त, मुंबई साऊथमधून मिलींद देवरा, गडचिरोली-चिमुर येथून डॉ. नामदेव उसेंडी यांना उमेदवारी जाहीर .
४. ऑस्ट्रेलियाकडून भारताचा पराभव : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यातील अंतिम सामन्यासह भारताने मालिका गमावली. १० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाने भारतात जिंकली वनडे मालिका.
५. कर्नाटकात लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि जेडीएस पक्षात आघाडी; काँग्रेस २०, तर जेडीएस ८ जागांवर लढणार
६. प्रियंका गांधी आणि ज्योतिरादित्य शिंदे यांनी घेतली भीम आर्मी प्रमुख चंद्रशेखर यांची घेतली भेट. उत्तर प्रदेशाच्या राजकारणात खळबळ
७. भाजप-शिवसेना युतीनंतर पहिला संयुक्त मेळावा शुक्रवारी सकाळी अमरावतीत व सायंकाळी नागपुरात होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची उपस्थिती.
८. औरंगाबाद आणि जालना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा प्रचार १५ मार्चपासून सुरू करणार- जिल्हाध्यक्ष आमदार अब्दुल सत्तार यांची घोषणा.
९. संयुक्त राष्ट्रः मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात चीनचा विरोध; फ्रान्सचा प्रस्ताव फेटाळला.
१०. पुणे पोलिसांचे न्यायालयात शपथपत्र : कोरेगाव भीमा हिंसेप्रकरणी अटक करण्यात आलेल्या माओवाद्यांशी संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांचा सरकार उलथवून लावण्याचा डाव होता.
११. आम्ही दुसऱ्याच्या पोरांचेही लाड करतो : उद्धव ठाकरेंचा पवारांना टोला : ‘इतरांची पोरं नुसती धुणीभांडी करण्यासाठी असतात असं आम्ही समजत नाही.
१२. आठवडाभरात राज्यात अनेक मोठे राजकीय भूकंप : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील
१३. कागलमध्ये विखेंनी घेतली एका नेत्याची गुप्त भेट ? : काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी कागलमध्ये जाऊन एका नेत्याची भेट घेतल्याचे वृत्त आहे .