News Updates : गल्ली ते दिल्ली : एक नजर : महत्वाच्या बातम्या

1. सुजय विखे पाटील यांच्या पक्षांतरानंतर : सुजयच्या भाजप प्रवेशाने राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर टीकेचा भडिमार
२. दुसऱ्याच्या मुलाचा हट्ट मी का पुरवू, शरद पवारांचा टोला : ज्याने त्याने ज्याच्या त्याच्या मुलाचा हक्क पुरवावा . इतर पक्षांची ती जबाबदारी नाही.
३. अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी कधी ना कधी निवडणुकीत पराभूत झाले आहेत. मी कधीच पराभूत झालो नाही. : पराभवाच्या भीतीने मी माघार घेतली हे भाजपचं म्हणणं बालिशपणाचं, मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत : शरद पवार
४. आगामी लोकसभा निवडणुकांबाबतीत काँग्रेस-राष्ट्रवादी गंभीर नाहीत – स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी
५. नरेंद्र मोदी मेक इन इंडियाच्या बाता मारतात; मात्र, देशातील युवक अन्य ठिकाणी नोकऱ्या शोधत आहेत – राहुल गांधी : देशात ४५ लाखांपेक्षा जास्त बेरोजगारी
६. मुलाने भाजपमध्ये प्रवेश केला म्हणून लगेच मी विरोधी पक्ष नेता पदाचा राजीनामा दिलेला नाही. पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडेन- राधाकृष्ण विखे पाटील,
७. प्रा. आनंद तेलतुंबडेंना हायकोर्टाचा दिलासा : तेलतुंबडेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावरील सुनावणी २२ मार्चपर्यंत तहकूब.
८. अखेर सुजय विखे पाटील यांनी भाजपत प्रवेश : सुजय विखे पाटील यांचे नाव उमेदवारीसाठी भाजपच्या संसदीय मंडळाकडे पाठवणार- फडणवीस. घरामध्ये बंड करून घेतला भाजपत प्रवेश करण्याचा निर्णय. : मोदींवर विश्वास असल्याने सुजय भाजपात : देवेंद्र फडणवीस
९. काँग्रेसबरोबरचे चर्चेचे सर्व प्रस्ताव संपुष्टात : लवकरच सर्व जागांचे उमेदवार घोषित करणार : प्रकाश आंबेडकर यांचा आघाडीला दणका.
१० . मायावतींच्या नकार काँग्रेसला झोंबला : आम्हालाही मायावतींची गरज नाही, काँग्रेसकडून मायावतींना खरमरीत उत्तर . तर ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले मायावतींच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो.
११. काँग्रेससोबत कुठेच युती करणार नाहीः मायावती बसपा कुठल्याही पक्षाशी युती करणार नाही. निवडणुकीपूरता होणारी ही युती पक्षासाठी धोकादायक
१२. ‘मसूदला काँग्रेसनं पकडलं, पण भाजपने सोडलं’ : राहुल गांधी. गांधीनगरमध्ये जाहीर सभा घेत काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा नारळ फुटला . सोनिया आणि प्रियंकाचीही सभेत मोदी सरकारवर टीका .
१३. राज्यात मुलं पळवणारी टोळी आली : जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटने महाराष्ट्राच्या राजकारणात विनोदाची लाट
१४. जालना : जालन्यातून लोकसभा लढविण्याचा आग्रह करत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा खोतकरांच्या निवास्थानासमोर ठिय्या.
१५. भाजपा आमदाराच्या दुसऱ्या पत्नीची पहिली विरोधात पोलिसात तक्रार
१६. औरंगाबादसह राज्यातील दोन ठिकाणी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत आग्रही, आमदार इम्तियाज जलील यांच्यासह महाराष्ट्रातील एमआयएमचे नेते हैदराबादमध्ये.