ह्रदयद्रावक घटना : आधी खेळ , मग जेवण आणि रसमलाईतून दिले विष !! पित्याची मुला-मुलीसह आत्महत्या !!!

Advertisements
Advertisements
Spread the love

एका व्यक्तीने आपल्या दोन मुलांना रसमलाईतून  विष देऊन नंतर स्वत:ही आत्महत्या केली . तत्पूर्वी त्यांनी  दोन्ही मुलांबरोबर लुडो हा मोबाइल गेम खेळला नंतर  सर्वांना जेवण दिल्यानंतर पत्नी दुसऱ्या खोलीत झोपण्यास गेली होती. सुंदरपाल हे त्यांचा मुलगा तुषार आणि मुलगी माही यांच्याबरोबर सोमवारी रात्री उशिरा आपल्या खोलीत झोपण्यास गेले.  आर्थिक चणचणीमुळे त्याने हा प्रकार केल्याचे सांगण्यात येते. गाझियाबाद येथे एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. याप्रकरणी सिंहानी गेट पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सुंदरपाल असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून तो हॉटेल चालक होता. त्याने आपल्या मुलगा आणि मुलीला विष देऊन मारले आणि नंतर स्वत: गळफास घेतला. यात तिघांचाही मृत्यू झाला आहे.

Advertisements

पत्नी झोपी गेल्यानंतर सुंदरपाल याने रसमलाईतून दोन्ही मुलांना विष दिले आणि नंतर स्वत: गळफास घेतला. मध्यरात्री जेव्हा पत्नी उठली तेव्हा तिला खोलीतील लाइट सुरु असल्याचे दिसले. खोलीत गेल्यानंतर पत्नीला दोन्ही मुलांचे मृतदेह आणि पती सुंदरपाल यांनी गळफास घेतल्याचे दिसले. सुंदरपाल हे कुलू मनाली येथे एक ढाबा चालवत होते. पण मागील दोन महिन्यांपासून ते घरीच होते, असे सांगितले जाते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुंदरपाल यांना प्रत्येक कामात अपयश येत होते. त्यामुळे ते नैराश्येत गेले होते. त्यातच सुंदरपाल यांचा मोठा मुलगा तुषार हा मानसिक रुग्ण होता. त्याला बोलता ही येत नव्हते. तर मुलगी माही ही पाचव्या इयत्तेत शिकत होती. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!