मुंबईतील आय पी एस अधिकाऱ्यांच्या बदल्या

दक्षिण प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त प्रवीण पडवळ आणि मध्य प्रादेशिक विभागाचे अपर पोलीस आयुक्त रवींद्र शिसवे यांना निवडणुकीपर्यंत मुदतवाढ देण्यात यावी यासाठी राज्य सरकारने निवडणूक आयोगाकडे मागणी केली होती. मात्र ही मागणी निवडणूक आयोगाने नाकारली. त्यामुळे शिसवे यांची संरक्षण व सुरक्षा तर प्रवीण पडवळ यांची वाहतूक शाखेत बदली केली आहे. याशिवाय संरक्षण व सुरक्षा पाहणारे निशित मिश्रा यांच्याकडे दक्षिण प्रादेशिक विभाग तर वाहतूक शाखेचे एस. वीरेश प्रभू यांच्याकडे मध्य प्रादेशिक विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या अधिकाऱ्याव्यतिरिक्त अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या तीन अधिकाऱ्याचीदेखील बदली करण्यात आली. त्यात राजेंद्र सिंह यांना विशेष कृती दल, एस. जगन्ननाथन यांच्याकडे नियोजन व समन्वय आणि धनंजय कमलाकर धोरण विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.