Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कोणत्याही पक्षाला सैन्य दलाचे फोटो पोस्टरवर लावणे आता “मुमकीन” नाही : निवडणूक आयोग

Spread the love

लोकसभेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुलवामा हल्ला, भारतीय हवाई दलाचे सर्जिकल स्ट्राइक, विंग कमांडर अभिनंदन, पाकिस्तानचे पाडलेले विमान, अशा घटनांचा उपयोग निवडणुकांमध्ये करून घेण्याच्या तयारीत असलेल्या पक्षांना संरक्षण दलातील कोणत्याही व्यक्तीचे छायाचित्र निवडणूक प्रचारातील साहित्यात न वापरण्याची सक्त ताकीद निवडणूक आयोगाने  दिली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने याबाबतचे तसे प्रसिद्धीपत्रकच जारी केले आहे.

निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या या पत्रकात म्हटले आहे की, संरक्षण विभागातील व्यक्तींची छायाचित्रे विविध पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांकडून आपल्या निवडणूक प्रचारादरम्यान वापरले जात असल्याबाबतची माहिती संरक्षण विभागाने निवडणूक आयोगाला दिली. याप्रकरणी राष्ट्रीय आणि स्थानिक पक्षांना योग्य सूचना देण्याची विनंती संरक्षण विभागाकडून करण्यात आली होती. त्यानुसार उपरोक्त निर्देश देण्यात आल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे.

सशस्त्र दल देशाच्या सीमा, राजकीय यंत्रणा आणि नागरिकांच्या संरक्षणाची महत्त्वाची भूमिका बजावत असतात. अशा दलांचा राजकारण आणि निवडणुका यांच्याशी थेट संबंध नसतो. त्यामुळे सशस्त्र दलांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा वापर निवडणूक प्रचारादरम्यान करण्यात येऊ नये, असेही आयोगाने नमूद केले आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!