Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Rafale deal: ‘राफेल’च्या कागदपत्रांची झाली चोरी : न्यायालयात सांगताहेत महाधिवक्ता !!

Spread the love

राफेल लढाऊ विमान खरेदी करारासंबंधीची महत्वाची कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून चोरीला गेल्याची माहिती सरकारच्या वतीनं महाधिवक्ता के. के. वेणूगोपाळ यांनी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी दरम्यान दिली. दरम्यान, कागदपत्रे चोरीप्रकरणी सरकारने काय कारवाई केली हे सांगावे, असे आदेश कोर्टाने महाधिवक्त्यांना दिले. लोकसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा राफेल प्रकरण चर्चेत आलं आहे. राफेल प्रकरणी १३ डिसेंबर २०१८ रोजी सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निर्णयावर दाखल फेरविचार याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुनावणीच्या सुरुवातीलाच ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी काही कागदपत्रे सादर केली. मात्र, या प्रकरणी आणखी नवीन पुरावे स्वीकारू शकत नाही, असं सांगत त्यांनी दिलेली कागदपत्रे स्वीकारण्यास नकार दिला.

सरकारच्या वतीनं महाधिवक्ता के. के. वेणूगोपाळ यांनी बाजू मांडली. ‘राफेल’संबंधी महत्वाची कागदपत्रे संरक्षण मंत्रालयातून कर्मचाऱ्याकरवी चोरीला गेली आहेत. याचा तपास सुरू आहे. हे खूप संवेदनशील प्रकरण आहे, असं त्यांनी सांगितलं. याचिकाकर्ते अॅड. भूषण आणि दोन वृत्तपत्रांसह अन्य व्यक्ती चोरी गेलेल्या कागदपत्रांवर विश्वास दाखवत आहेत. त्यामुळं त्यांना अधिकृत गोपनीयता कायद्यान्वये खटल्याचा सामना करावा लागू शकतो. आम्ही दोन वर्तमानपत्रे आणि एका ज्येष्ठ वकिलाविरोधात कारवाई करणार आहोत, अशी माहितीही त्यांनी कोर्टात दिली.
दरम्यान, जी कागदपत्रे चोरीला गेली आहेत, त्या प्रकरणी सरकारने काय कारवाई केली हे सांगावे, असे आदेश कोर्टानं महाधिवक्ता वेणूगोपाळ यांना दिले. दरम्यान, दोन वाजता पुन्हा या प्रकरणी कोर्टात सुनावणीला सुरुवात होणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!