Abhinandan : भारताच्या वाघाचे वाघा बॉर्डरवर आगमन : ट्रम्प यांची “गुड न्यूज ” खरी ठरली !!

ट्रम्प यांची “गुड न्यूज ” खरी ठरली !!
काल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीय हवाई दलाचे वैमानिक अभिनंदन यांना सुखरूप भारताच्या पोहोचविण्याची घोषणा लोकसभेत करण्यापूर्वीच सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी “लवकरच भारताला गुडन्यूज मिळणार” असे वक्तव्य केले होते. भारताने अभिनंदन यांच्या सुटकेसाठी जाहीररीत्या काहीही न बोलता पाकिस्तानवर दबाव आणला हे विशेष!! त्याचाच भाग म्हणून पाकिस्तानच्या ताब्यात असलेले भारतीय वायुदलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्थमान काही वेळात मायदेशी परतणार आहेत. वाघा बॉर्डरमागे अभिनंदन भारतात पोहोचणार आहेत. त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित आहेत.
दरम्यान सकाळपासूनच वाघा बॉर्डरवर लोकांनी अभिनंदन यांच्या स्वागतासाठी गर्दी केली आहे. अभिनंदन यांचं आगमन होणार असल्या कारणाने नेहमी होणारा बीटिंग द रिट्रीट हा सोहळाही रद्द करण्यात आला. शुक्रवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी शांततेसाठी अभिनंदन यांची सुटका करत असल्याची घोषणा केली.
कालच अभिनंदन यांची सुटका करत असल्याची घोषणा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली होती . संसदेत बोलताना इम्रान खान यांनी शांततेसाठी आपण भारतीय वैमानिकाची सुटका करत असल्याचं सांगितलं. आज दुपारपर्यंत वाघा बॉर्डरच्या मार्गे अभिनंदन भारतात परतणार असल्याची माहिती आहे. अभिनंदन यांची सुटका करत तात्काळ भारतात पाठवण्यात यावं अशी मागणी भारताकडून कऱण्यात आली होती. कोणतीही चर्चा न करता पाकिस्तानने आमच्या वैमानिकाला भारतामध्ये पाठवावे अशी कठोर भूमिका भारताने घेतली होती.