Pakistan : पायलट अभिनंदन यांच्या सुटकेचा निर्णय दोन दिवसात

पाकिस्तानच्या ताब्यात असलेला पायलट अभिनंदनबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसात घेतला जाईल, अशी माहिती पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते डॉ. महमद फैसल यांनी दिली आहे. अभिनंदनला युद्धकैदी म्हणून ठेवायचं की नाही याबाबतचा निर्णय येत्या दोन दिवसात घेतला जाणार आहे, असं डॉ. फैसल यांनी सांगितलंय. पायलट अभिनंदन हे पाकिस्तानच्या ताब्यात सुरक्षित असून त्यांना त्रास दिला जात असल्याच्या वृत्ताचा डॉ. फैसल यांनी इन्कार केला आहे. जिनिव्हा कराराचा कुठंही भंग झालेला नाही. भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या हद्दीत घुसून केलेला हल्ला हा आमच्या सैन्यावरचा हल्ला असल्याचं डॉ. फैसल म्हणाले.