IAF Air stirke Pakistan : मुंबईसह राज्यात सर्वत्र “हाय अलर्ट “

केंद्र सरकारने देशाच्या सर्व प्रमुख शहरात आणि राज्याच्या गृह विभागाने महाराष्ट्रातील सर्व विभागाचे कर्मचारी व अधिकाऱ्यांकरिता अतिदक्षतेचा इशारा जारी केला आहे. पाकिस्तानसोबतचे संबंध तणावपूर्ण झाल्याने व सीमेवर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर हा अतिदक्षतेचा इशारा जारी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, मुंबईतही सर्व प्रमुख ठिकाणी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सुरक्षेचा आढावा घेतला.
बुधवारी गृह विभागाने त्याबाबत प्रशासानाच्या प्रत्येक विभागाला नोटीस काढून अतिदक्षतेचा इशारा असल्याचे सूचित केले आहे. राज्यातील सर्व सरकारी रुग्णालये व संबंधित सेवांनाही हाय अॅलर्ट जारी करण्यात आला असून कुठल्याही आणीबाणीच्या परिस्थितीशी सामना करण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
संबंधित बातम्या …
पुलवामा हल्ल्याबद्दल इंग्लंडच्या पंतप्रधान थेरेसा मे यांच्याकडून सहानुभूती व्यक्त; दोन्ही देशांशी संवाद साधला असून, संयम ठेवण्याचे मे यांचे आवाहन
>> देशाच्या सुरक्षिततेसाठी, अखंडत्वासाठी सीमाभागातील दहशतवादी कारवायांविरोधात ठोस पावले उचल्याचा आम्हाला अधिकार; परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडून स्पष्ट
>> पुलवामा हल्ल्याचे पुरावे पाकिस्तानला सुपुर्द; जैश-ए-मोहम्मद दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे नमूद
>> मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी घेतला राज्यातील तसेच सीमा भागातील सुरक्षेचा आढावा
>> पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या पायलटला सुरक्षितपणे मायदेशात पाठवण्याची भारताची मागणी
>> भारत आणि पाकिस्ताननं संयम ठेवावा; रशियाच्या राष्ट्राध्यक्षांचं आवाहन
>> पुलवामा हल्ल्यासंदर्भात २१ विरोधी पक्षांची संयुक्त बैठक संपन्न; हवाई दलाच्या प्रत्युत्तराचे कौतुक
>> बेपत्ता पायलट सुखरुप परत येईल; काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना विश्वास