Pulwama Attack : एटीएसच्या ताब्यातील तरुणांनी दिली खळबळजनक माहिती …

पुलवामा नंतर जैश-ए-मुहम्मद एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याच्या तयारीत होती …
जैश-ए-मोहम्म्दचा काश्मीरमधील हस्तक अब्दुल गाझी आणि पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार याच्या आम्ही सातत्याने संपर्कात होतो अशी खळबळजनक माहिती उत्तर प्रदेशातील देवबंद येथून अटक करण्यात आलेल्या दोन काश्मीरी तरुणांनी दिली आहे. तसंच पुलवामा नंतर जैश-ए-मुहम्मद एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा बेत आखत होता अशी माहितीही या दोघांच्या चौकशीतून स्पष्ट झालं आहे. या दोन तरुणांपैकी शहनवाझ तेली कुलगावचा असून तो बी.ए प्रथम वर्षाला आहे तर आकिब पुलवामाचा असून त्याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे.हे दोघंही बीबीएमच्या या सोशल साइटच्या माध्यमातून जैशच्या दहशतवाद्यांच्या संपर्कात होते. पुलवामा प्रकरणी या दोघांचा काही हात होता का याचा तपास सध्ये उत्तर प्रदेश एटीएस घेते आहे.
सहारनपूरजवळील देवबंद येथून या दोघांना उत्तर प्रदेश एटीएसने अटक केली आहे. या दोघांचे मोबाइल तपासल्यानंतर त्यातून काही व्हॉइस मॅसेजेसमध्ये बडा काम ( दहशतवादी हल्ला) आणि सामान ( शस्त्र) असे शब्द वापरले गेल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोघांची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर आपण जैश-ए-मोहम्मदच्या संपर्कात असल्याचे दोघांनीही कबूल केले आहे. शहनवाझ दीड वर्षांपासून जैशच्या संपर्कात असून सहा महिन्यांपासून आकिब त्यांच्या संपर्कात आहे. जैशच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या दोघांशी वारंवार संपर्क साधल्याचंही त्यांनी सांगितलं. काश्मीरला परत जाऊन दोघंही जैशच्या ‘सैन्यात’ भर्ती होण्याच्या तयारीत होते.