Narendra Modi : भेटेन तीन महिन्यांनी … नरेंद्र मोदी यांची मन कि बात !!

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरुन शेवटच्या ‘मन की बात’ द्वारे जनतेशी संवाद साधला. मात्र, निवडणुकीनंतरही आपण पुढील मन की बातमधून संवाद साधू असे म्हणत ही निवडणूक जिंकून पुन्हा पंतप्रधानपदी असू असा विश्वास यावेळी मोदींनी व्यक्त केला.
मोदी म्हणाले, पुढील दोन महिन्यांसाठी आम्ही सर्वजण निवडणुकांच्या प्रचारात व्यस्त राहणार आहोत. मी स्वतः या निवडणुकीत उमेदवार आहे. निरोगी लोकशाही परंपरेचा सन्मान करताना पुढची ‘मन की बात’ मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी होईल. मार्च, एप्रिल आणि संपूर्ण मे महिना या तीन महिन्यांच्या काळात आमच्या सर्व भावना मी निवडणुकीनंतर नव्या विश्वासाने आपल्यासमोर पुन्हा एकदा ‘मन की बात’च्या माध्यमांतून मांडेन त्यानंतर अनेक वर्षे आपल्याशी संवाद साधत राहिन, अशा प्रकारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपण पुन्हा पुढील सरकार स्थापन करु असा विश्वास व्यक्त केला.
तत्पूर्वी मोदी म्हणाले, आजची ‘मन की बात’ सुरु करताना आज मन भरुन आले आहे. दहा दिवसांपूर्वी भारतमातेने आपल्या वीर पुत्रांना गमावले. या पराक्रमी वीरांनी आपल्या सव्वाशे कोटी भारतीयांच्या संरक्षणासाठी स्वतःचे बलिदान दिले. देशवासीयांनी निश्चिंत रहावे यासाठी यासाठी आपल्या या शूर-विरांनी दिवसरात्र एक केले होते.
मोदी म्हणाले, आपल्या सैन्य दलांनी नेहमीच अतुलनिय शौर्य दाखवून दिले आहे. एकाबाजूला त्यांच्याकडे अशांत भागात शांतता प्रस्थापित करण्याचे कौशल्य आहे. दुसरीकडे ते दहशतवादाला त्यांच्या भाषेत कसे उत्तर द्यायचे याची त्यांना चांगली माहिती आहे.
स्वातंत्र्यानंतर अद्याप आपल्याकडे शहीदांच्या सन्मानार्थ युद्ध स्मारकाची उभारणी झाली नाही. मात्र, आता ही प्रतिक्षा संपली आहे. भारताकडे राष्ट्रीय युद्ध स्मारक नाही यामुळे मी आश्चर्यचकीत झालो होतो, त्याचे मला मनस्वी दुःखही झाले. मात्र, आम्ही हे युद्ध स्मारक उभारले असून हे नवे स्मारक इंडिया गेट आणि अमर जवान ज्योतीजवळ असल्याची माहिती यावेळी मोदींनी दिली.