jammu & kashmir अफवांवर विश्वास ठेवू नका : राज्यपाल सत्यपाल मलिक

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू आणि काश्मीर सीमारेषवर मोठा तणाव निर्माण झाला आहे. तर, पाकिस्तानी रेंजर्स आणि दहशतवाद्यांकडून सीमारेषेवर कारवाया सुरूच आहेत. भारतीय सैन्याकडूनही पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्यात येत आहे. काश्मीरच्या काही भागांमध्ये स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका होत असल्याने काश्मीरमध्ये निमलष्करी दलाच्या १००तुकड्या पाठविण्यात येत असून सुमारे १० हजार जवान तिथे तैनात करण्यात येत आहेत. इकडे कुठलीही युद्धजन्य परिस्थिती नसून देशातील नागरिकांना शांत राहण्याचे तसेच अफवांवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी यांनी केले आहे.
काश्मीरच्या राजौरी जिल्ह्याच्या नौशेरा सेक्टरमधील २७ पेक्षा अधिक गावे खाली करण्यात आली आहेत. तसेच बॉर्डरवर निमलष्कर दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या असून १० सैन्याचा ताफा काश्मीरच्या सीमारेषेवर सुरक्षा सीमारेषेवर पाकिस्तानी रेंजर्स आणि दहशतवाद्याकडून चकमकी सुरूच आहेत. बुधवारी आणि गुरूवारी सीमा रेषेवर झालेल्या गोळीबारांनंतर येथील गावांना खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या गावातील स्थलांतरीतांना आवश्यक ते सामान सोबत घेण्यास बजावले असून शाळा आणि सरकारी भवनांमध्ये आश्रय देण्यात येत आहे. पाकिस्तानी सीमारेषेपासून दूर असलेल्या ठिकाणी या गाववाल्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात येत आहे. एलओसीजवळी गावांना खाली करण्यासंदर्भात नोटीस जारी करण्यात आल्याची सुत्रांची माहिती आहे. मात्र, येथील गावकरी आपल्याच गावात राहण्यास उत्सुक असल्याचं राजौरी जिल्ह्याचे पोलीस उप-आयुक्त मोहम्मद एजाज असद यांनी गावचा दौरा केल्यानंतर म्हटले. मात्र, सुरक्ष जवानांकडून त्यांना सरकारी योजनांची माहिती देण्यात येत असून त्यांचे मन विळविण्यात येत असल्याचेही असद यांनी सांगितले.
दरम्यान, सध्या काश्मीरमधील काही भागांत निवडणुका होत आहेत. त्यासाठी सैन्याची अतिरिक्त कुमक काश्मीरच्या सीमाभागात मागविण्यात आली आहे. त्यामुळे काश्मीरमधील नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तसेच देशातील सर्वच नागरिकांनी शांतता राखावी, असे आवाहन राज्यपाल मलिक यांनी केले आहे. तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका, असेही मलिक यांनी म्हटले आहे.