भारत-पाकिस्तान युद्ध होणं अशक्य : परवेझ मुशर्रफ

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांनी पाक सरकारला सल्ला देताना म्हटले आहे कि , पाकिस्तानने भारतावर एक अणुबॉम्ब टाकला, तर भारत २० अणुबॉम्ब टाकून आम्हाला नेस्तनाबूत करून टाकेल. त्यामुळे भारत-पाकिस्तान युद्ध होणं अशक्य असल्याचं परवेझ मुशर्रफ यांनी स्पष्ट केलं. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर, युद्धाचे ढग दाटले असताना, त्यांचं हे विधान महत्त्वपूर्ण मानलं जातंय. अबुधाबी इथल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भारत आणि पाकिस्तानमधील वितुष्ट अगदी टोकाला गेलं आहे. परंतु, त्यांच्यात अणुहल्ला होणार नाही. आम्ही जर भारतावर एक अणुबॉम्ब टाकला, तर २० अणुबॉम्ब टाकून ते प्रत्युत्तर देतील, आम्हाला संपवतील. ते जर नको असेल, तर भारतावर ५० अणुबॉम्ब टाकावे लागतील. त्यासाठी तुम्ही तयार आहात का?, असा प्रश्न करत त्यांनी अणुहल्ल्याची शक्यता फेटाळून लावली.