राहुल गांधी यांच्या शिवजयंतीच्या मराठीतून शुभेच्छा

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मराठीमधून ट्विट करून महाराजांना नमन केले आहे. छत्रपछत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते, असे राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.आपल्या ट्विटमध्ये राहुल गांधी म्हणतात, ‘छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते. सर्व समाजातील मावळे एकत्रित करून त्यांनी स्वराज्य उभारलं आणि जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न केला, त्यांचं जीवन आणि राज्य कारभार जगासाठी अनुकरणीय आहे. या महान राजास जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.’ या ट्विटच्या शेवटी त्यांनी #शिवाजीमहाराजकिजय हा हॅशटॅगही वापरला आहे. आज देशभरामध्ये शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात असून अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील अनेक गड-किल्ल्यांवरही आज शिवजयंतीचा उत्साह दिसून येत आहे. ऑफलाइनबरोबरच ऑनलाइन माध्यमांवरही शिवाजी महाराजांबद्दल फोटो, व्हिडीओ आणि स्टेटसच्या माध्यमातून नेटकरी आपल्या भावना व्यक्त करताना दिसत आहेत. सकाळपासूनच ट्विटवर #ShivajiMaharaj तसेच #ShivajiJayanti हे दोन हॅशटॅग टॉप ट्रेण्डींग हॅशटॅग आहेत.