काश्मिरी मालावर बहिष्कार टाका : मेघालायचे राज्यपाल

मेघालायचे राज्यपाल तथागत रॉय यांनी पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एका सेवानिवृत्त कर्नल च्या सूचनेनुसार काश्मिरी मालावर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे जेंव्हा कि लष्कर आणि सीआरपीएफच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन काश्मिरी जनता आणि विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन आज एका पत्रकार परिषदेत केले आहे .
दरम्यान स्वतःला हिंदुत्ववादी म्हणवून घेणारे मेघालायचे राज्यपाल तथागत रॉय म्हणतात कि , काश्मिरी सामानावर बहिष्कार टाका . इतकेच नव्हे तर काश्मीरला जाणेही लोकांनी टाळावे . दोन वर्षासाठी अमरनाथ यात्रा वर्ज्य करावी . त्यांच्या या ट्विटवरून बराच वाद निर्माण झाला आहे .