# गल्ली ते दिल्ली #News_Updates

#दिवसभरातील महत्वाच्या बातम्या …
१. जम्मू-काश्मीर: पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांची संख्या ४० वर
२. पुलवामा हल्ला: ३५० किलो स्फोटकं असलेल्या कारने सीआरपीएफ जवानांच्या ताफ्याला दिली होती धडक
३. पुलवामा हल्ला: एनआयएचे पथक उद्या सकाळी घटनास्थळी दाखल होणार
४. उद्या सकाळी केंद्रीय सुरक्षा समिती बैठक.
५. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध
६. सीआरपीएफ जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ दिले जाणार नाही; पंतप्रधान.
७. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्याशी केली चर्चा
८. जम्मू-काश्मीरः श्रीनगर- जम्मू हायवेवर सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला.
९. दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद संघटनेने स्विकारली.
१०. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दहशतवादी हल्ल्याचा केला निषेध
११. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री उमर अब्दुला यांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला.
१२. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी पत्रकार परिषद रद्द केली; मौन राखत शहिदांना वाहिली आदरांजली.
१३. पुलवामा हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सूचना व माहिती प्रसारण खात्याने टीव्ही वाहिन्यांसाठी मार्गदर्शक तत्वे जारी केली
१४. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह उद्या पुलवामामध्ये जाणार; पाटणा येथे उद्या होणारी सभा रद्द
इतर बातम्या ….
१. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूल मंत्री चंद्रकांत पाटील शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी ‘मातोश्री’वर दाखल
२. युती झाली किंवा नाही झाली तरी मुख्यमंत्री शिवसेनेचाच – संजय राऊत
३. मित्रपक्षांसाठी आठ जागा सोडण्याची आघाडीची तयारी, मात्र महाआघाडी न झाल्यास काँग्रेस २६ तर राष्ट्रवादी काँग्रेस २२ जागा लढण्याची शक्यता
४. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार माढा मतदार संघातून निवडणूक लढणार
५. : ४-५ दिवसांत अंतिम यादी जाहीर करु-प्रफुल्ल पटेल
६. बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांची सुमारे ९०४ कोटींची संपत्ती ईडीने केली जप्त
७. बीड येथील लाचखोर अप्पर जिल्हाधिकारी बाबुराव मरीबा कांबळे याच्याकडे कोट्यावधींची माया; संपत्तीची मोजदाद करताना एसीबीच्या अधिकाऱ्यांची दमछाक