बँकांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर वाढणार?

बँकांच्या मुदत ठेवींवरील व्याजदर वाढणार?
देशातील बँकांना कर्जपुरवठ्यामध्ये तेजी आणण्यासाठी खात्यांमध्ये मार्च २०२० पर्यंत विविध ठेवींद्वारे २० लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा होणे आवश्यक आहे. त्यासाठी ठेवीदारांना आकर्षक व्याजदर देण्याची गरज आता बँकांना भासणार आहे. क्रिसील या संस्थेच्या एक अहवालानुसार खासगी क्षेत्रातील बँकांचा यात ६० टक्के वाटा असेल.
गेल्या काही वर्षांत मुदत ठेवींवर व्याजदर घटत चालला आहे. गेल्या काही वर्षांत बँकाना ग्राहकांच्या ठेवींमधून सरासरी वार्षिक ७ लाख कोटी रुपये मिळत आहेत. अतिरिक्त जमेसाठी बँकांवर मुदत ठेवींवर अधिक व्याज देण्याचा दबाव वाढत आहे. शेअर बाजारात सध्या खूप उतार-चढाव आहेत. गुंतवणुकीच्या अन्य पर्यायांनाही फारशी मागणी नाही. परिणामी ग्राहक पुन्हा बँकांच्या मुदत ठेवींकडे वळू शकतात. म्हणूनच बँकांना त्यांना आकर्षक व्याजदर द्यावे लागणार आहे.