AccidentNewsUpdate : मोदींचे भाऊ प्रल्हाद मोदी यांच्या कारला अपघात …

बेंगळुरू : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी म्हैसूरजवळ झालेल्या कार अपघातात किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी, मुलगा आणि सून होती. अपघाताच्या वेळी त्यांचा ताफाही एकत्र प्रवास करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास हा अपघात झाला. प्रल्हाद मोदी बांदीपूरला जात होते . या अपघातात त्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांना म्हैसूर येथील जेएस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बांदीपूरकडे जाताना प्रल्हाद मोदी यांची कार डिव्हायडरला धडकली. त्याचा नातूही जखमी झाला आहे. सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. घटनेच्या दृष्यात कारच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून येते. पीएम मोदींच्या नातवाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे.