MadhyaPradeshUpdate : धक्कादायक : थेट उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तींच्या कोर्टातच आणला वकिलाचा मृतदेह …!!

भोपाळ : एखाद्या पोलीस ठाण्यासमोर किंवा शासकीय कार्यालयासमोर मृतदेह आणल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील पण मध्य प्रदेशात थेट भोपाळच्या उच्च न्यायालयात वकिलाचा मृतदेह आणल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेशच्या जबलपूरमधून हि धक्कादायक घटना समोर आली आहे.
मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या वक्तव्यामुळे दुखावलेल्या वकिलाने आत्महत्या केल्याचा दावा या प्रकरणात केला जात आहे. दरम्यान सहकारी वकिलाच्या आत्महत्येचे वृत्त समजताच इतर वकिलांनी गोंधळ सुरू केला. पोलिसांनी अनुराग साहू असे मृत वकिलाचे नाव सांगितले आहे. आपल्या सहकाऱ्यांची आत्महत्येची बातमी मिळताच सहकारी वकील अनुरागचा मृतदेह घेऊन थेट मुख्य न्यायाधीशांच्या कोर्टात पोहोचले.
MP हाईकोर्ट में वकीलों का हंगामा, कहा- जज की अनुचित टिप्पणी से आहत हो एक वकील ने किया सुसाइड pic.twitter.com/wVqGRyhSQs
— NDTV India (@ndtvindia) September 30, 2022
मिळालेल्या माहितीनुसार, याच प्रकरणावरून तेथील वकिलांनी न्यायालय आणि परिसरात मोठा गोंधळ घातला आणि तोडफोड केली. अनुरागचा मृतदेह घेऊन मुख्य न्यायमूर्ती संजय द्विवेदी यांच्या न्यायालयात जेंव्हा हे संतप्त वकील पोहोचले तेंव्हा न्ययाधीश त्यांच्या कोर्टात नव्हते . हे तेच न्यायमूर्ती आहेत ज्यांच्यावर आरोप आहे की अनुरागने त्यांच्या वक्तव्याने दुखावल्यामुळे आत्महत्या केली.
न्यायाधिशांनी केलेल्या अयोग्य टिप्पणीमुळे वकिलाने आत्महत्या केल्याची न्यायालयीन इतिहासातील ही पहिलीच घटना आहे. या घटनेच्या निषेधार्थ वकिलांचा आजही निषेध सुरू आहे.
या संपूर्ण प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलीस आणि एसटीएफची टीम उच्च न्यायालयात तैनात करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जोडीदाराच्या मृत्यूमुळे नाराज झालेल्या वकिलांनी सुरक्षा अधिकाऱ्यांशीही बाचाबाची केली. पोलीस सध्या या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. त्याचबरोबर या घटनेमुळे संतप्त वकिलांनी धरणे धरले आहे. उच्च न्यायालयात यापुढे गदारोळ होऊ नये यासाठी एसटीएफचे विशेष पथकही तेथे तैनात करण्यात आले आहे.