Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

KarnatakElectionUpdate : सायंकाळपर्यंत 65.69 टक्के मतदान , एक्जिट पोल नुसार कॉँग्रेस मारणार बाजी , जेडीस ठरणार हुकूमी एक्का !!

Spread the love

बंगळुरू : कर्नाटकातील निवडणुकीसाठी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 65.69 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. शेवटची टक्केवारी येण्यास अद्याप वेळ असल्याचे आयोगाकडून सांगण्यात येत आहे . या निवडणुकीचा निकाल 13 मे रोजी लागणार आहे. दरम्यान निवडणुकीपूर्वी आलेल्या बहुतांश सर्वेक्षण आणि जनमत चाचण्यांच्या आकडेवारीत कर्नाटकात काँग्रेसची स्थिती मजबूत दिसून येत असून काही चाचण्यांच्या नुसार त्रिशंकु स्थिति निर्माण झाल्यास जेडीस हा सरकार स्थापनेतील हुकूमचा एक्का असेल असे मानले जात आहे.


कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज दुपारी 3 वाजेपर्यंत 52.03 टक्के मतदान झालं होतं. त्यानंतर 5 वाजेपर्यंत 65.69 टक्के मतदान झालं. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी सुमारे महिनाभर प्रचार केल्यानंतर आता राज्यातील जनता सत्तेच्या चाव्या कुणाकडे देणार हे 13 तारखेला ठरणार आहे. भाजप सत्ता कायम ठेवणार की काँग्रेस सत्तेत येणार हे अवघ्या काही तासांमध्ये ठरणार आहे.

मल्लिकार्जुन खर्गेंना 130-135 जागांचा विश्वास

दरम्यान कर्नाटकात काँग्रेस सत्तेत येईल अशी शक्यता अनेकांनी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीही राज्यात 130 ते 135 जागा जिंकतील असा विश्वास व्यक्त केला आहे. लोकांना हे सरकार बदलायचे आहे. भ्रष्टाचार हटवून विकास घडवून आणणारे सरकार त्यांना हवे आहे, त्यामुळं काँग्रेस पक्ष सत्तेत यावा असे लोकांना वाटत असल्याचे मत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी व्यक्त केले. कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्ष पूर्ण बहुमताने 130-135 जागा जिंकेल असं ते म्हणाले.

जनमत चाचण्यात कॉँग्रेस आघाडीवर

13 मे रोजी मतमोजणी झाल्यानंतर कर्नाटकचे चित्र स्पष्ट होईल, मात्र त्याआधी एबीपी न्यूज-सीव्होटरने एक्झिट पोल समोर आणला आहे. विशेष म्हणजे निवडणुकीपूर्वी आलेल्या बहुतांश सर्वेक्षण आणि जनमत चाचण्यांच्या आकडेवारीत कर्नाटकात काँग्रेसची स्थिती मजबूत दिसून आली.

मतदान केंद्रावर हल्ला ..

राज्यात मतदानादरम्यान तीन ठिकाणी हिंसाचार झाल्याच्या बातम्याही आल्या आहेत. पोलिस सूत्रांनी सांगितले की, विजयपुरा जिल्ह्यातील बसवना बागेवाडी तालुक्यातील मसाबिनाल गावात EVM आणि VVPAT (व्होटर व्हेरिफायेबल पेपर ऑडिट ट्रेल) मशिन बदलल्या जात असल्याची अफवा पसरली. यानंतर संतप्त ग्रामस्थांनी काही ईव्हीएम आणि व्हीव्हीपीएटी मशिन्सची नासधूस केली आणि मतदान अधिकाऱ्यांच्या वाहनांचे नुकसान केले.

बंगगळुरूच्या पद्मनाभनगर विधानसभा मतदारसंघातील पपई गार्डनमधील मतदान केंद्रावर लाठ्या-काठ्या घेऊन आलेल्या काही तरुणांनी त्यांच्या राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर हल्ला केला. बेल्लारी जिल्ह्यातील संजीवरायनकोटमध्ये काँग्रेस आणि भाजपचे काही कार्यकर्ते एकमेकांना भिडले. कर्नाटकात सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली, सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान सुरू होते.

2018 मध्ये अशी होती स्थिति ..

2018 च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपने 104, काँग्रेसला 78 आणि जेडीएसने 37 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. याआधी भाजपचे बीएस येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली पण ते बहुमत सिद्ध करू शकले नाहीत, त्यानंतर काँग्रेस आणि जेडीएसने मिळून सरकार स्थापन केले. ते सरकारही 14 महिन्यांनी पडले. त्यानंतर भाजपने बंडखोर आमदारांच्या मदतीने सरकार स्थापन केले. भाजप नेते बीएस येडियुरप्पा यांना पुन्हा मुख्यमंत्री बनवण्यात आले पण दोन वर्षानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्री केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!