लिव्ह इन पार्टनरची हत्या करून ७ महिने केले नाटक

उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमधील वसुंधरा येथे एका तरुणाने लिव्ह इन पार्टनरची हत्या केली आहे. गॅरेज चालवणारा रमणन त्याच्या लिव्ह इन पार्टनर दिव्याला कुल्लूला घेऊन गेला होता. त्याने तिथे कारमध्ये गळा आवळून दिव्याचा खून करून तिचा मृतदेह डोंगरावरून खाली फेकला. पोलीस आणि दिव्याच्या कुटुंबीयांची दिशाभूल करण्यासाठी रमणने इंदिरापुरम पोलीस ठाण्यात ती बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. आपण दिव्याचा शोध घेत आहोत, असे रमण भासवत होता. जवळपास ७ महिने त्याने हे नाटक केले. दोन वर्षांच्या मुलीला घेऊन तो पोलीस ठाण्यात जाऊन रडत होता. मुलगी आईविना राहू शकत नाही. काहीतरी करा, असे म्हणत रमणने पोलिसांसमोर नाटक केले. पोलिसांनीदेखील त्याच्यावर विश्वास ठेवला.
रमणने इंदिरापुरम पोलीस ठाण्यात दिव्या बेपत्ता असल्याची तक्रार दिल्यानंतर रमण राम विहार वसाहतीत असलेल्या दिव्याच्या आईच्या घरात पोहोचला. दिव्या बेपत्ता झाली आहे. तिचा फोन बाथरुममध्ये पडून तुटला. तो दुरुस्ती करण्यासाठी दिला आहे, असे रमणने दिव्याच्या आईला सांगितले. रमणने दुसऱ्या तरुणीशी संबंध असल्याचे दिव्याने आईला सांगितले होते. त्यामुळे दिव्या नाराज होऊन निघून गेली असावी असा तिच्या आईचा समज झाला व रमणच्या बोलण्यावर आईने विश्वास ठेवला.
दरम्यान, रमणने अनेकदा वेगवेगळी माहिती दिली. काहीवेळा दिव्या नाराज होऊन घरातून गेल्याचे त्याने सांगितले. तर दिव्या का गेली हे आपल्याला माहीत नसल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला. दिव्याच्या फोनचे काय झाले? इतक्या दिवसांमध्ये तो दुरुस्त का झाला नाही? असे प्रश्न दिव्याची आई बिट्टोने रमणला विचारले. मात्र रमणने उत्तर दिले नाही. त्यामुळे बिट्टोला संशय आला. बिट्टो पोलीस ठाण्यात पोहोचल्या. त्यांनी रमणची चौकशी करण्याची मागणी केली.
दिव्याचा फोन कुठे आहे, असा प्रश्न पोलिसांनी विचारला. त्यावर दुरुस्तीला दिला आहे, असे उत्तर रमणने दिले. मात्र फोन कुठे दुरुस्तीला दिला आहे या प्रश्नाचे उत्तर त्याने दिले नाही. पोलिसांनी फोनचे कॉल तपशील आणि लोकेशन काढले. शेवटचे लोकेशन कुल्लू होते. त्यानंतर रमणच्या फोनचे लोकेशन तपासण्यात आले. १८ मे रोजी दोन्ही फोनचे लोकेशन कुल्लूमध्ये होते. त्यामुळे संशय वाढला.१७ मे रोजी फ्लॅटच्या आसपासचे सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. एका फुटेजमध्ये रमण दिव्यासोबत कारमध्ये बसताना दिसला. यानंतर पोलिसांनी कसून चौकशी केली. तेव्हा रमण पोपटासारखा बोलू लागला. त्याने हत्येची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. सध्या या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
मुंबईतीत पुन्हा १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055