Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BiharPoliticalNewsUpdate : बिहारमध्ये नितीशकुमार यांचे नवा भिडू नवे राज , दुपारी घेणार शपथ

Spread the love

पाटणा : जेडीयूचे ज्येष्ठ नेते नितीश कुमार आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव आज अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत. भाजपपासून फारकत घेतल्यानंतर नेते नितीश कुमार यांनी सात पक्षांच्या ‘महागठबंधन’सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामध्ये तेजस्वी यादव यांचा आरजेडी आणि इतर विरोधी पक्ष आहेत.


उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही राजभवनात दुपारी २ वाजता एका साध्या समारंभात शपथ घेतील. त्यानंतर दोन सदस्यीय मंत्रिमंडळात आणखी मंत्र्यांचा समावेश केला जाईल. नितीश कुमार यांनी काल राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेतली आणि आठव्यांदा राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा केला. खरे तर नितीशकुमार यांनी मंगळवारी दोनदा राज्यपालांची भेट घेतली होती.

पहिल्यांदाच त्यांनी एनडीएची साथ सोडून मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तर तेजस्वीसह विरोधी महाआघाडीच्या इतर मित्रपक्षांसह राजभवनात जाऊन १६४ आमदारांच्या समर्थनाची यादी राज्यपालांना सादर केली. खरं तर, राजीनामा पत्र सादर केल्यानंतर, कुमार महागठबंधनच्या आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेण्यासाठी राबडी देवी यांच्या घरी गेले आणि तेथून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह नवीन सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्य भवनात गेले.

कोणाचे किती आमदार ?

सध्या बिहार विधानसभेत २४२ सदस्य आहेत आणि बहुमत मिळवण्याचा बहुमताचा  आकडा १२२ आहे. जो त्यांनी सध्या केला आहे. JD(U) चे ४५ आमदार आहेत आणि त्यांना एका अपक्ष आमदाराचा पाठिंबा आहे. तर राजदचे ७९ आमदार आहेत. काँग्रेसकडे १९, तर सीपीआय-एमएलकडे १२ आमदार आहेत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) प्रत्येकी दोन आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय-एम) यांनीही त्यांना पाठिंब्याची पत्रे दिली आहेत. हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे चार आमदारही कुमार यांच्यासोबत आहेत.

बिहारमध्ये सत्तेत असलेला जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला होता. त्यानंतर नितीश कुमार यांनी हे टोकाचे पाऊल उचलले.

केंद्रीय मंत्री अमित शहा हे सातत्याने जेडीयूमध्ये फूट पाडण्याचे काम करत असल्याचे नितीश कुमार यांचे मत आहे. नितीश कुमार यांनी पक्षाचे माजी नेते आरसीपी सिंह हे अमित शहा यांचे प्यादे म्हणून काम करत असल्याचा आरोप केला होता.
दुसरीकडे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जनतेच्या जनादेशाचा अपमान आणि विश्वासघात केल्याचा आरोप भाजपने केला आहे. त्याचवेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि बिहारचे राज्यसभा खासदार सुशील मोदी यांनी नितीश कुमार यांना सल्ला देताना  म्हटले आहे की, “राजदसोबत भाजपमध्ये असताना त्यांना (नितीश कुमार) यांना जो सन्मान मिळाला होता, तो मिळणार नाही. जास्त जागा असूनही आम्ही त्यांना मुख्यमंत्री केले आणि त्यांचा पक्ष फोडण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांनाच आम्ही तोडले. महाराष्ट्रात शिवसेनेने आमचा विश्वासघात केला असून त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागणार आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!