Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : आयकर भरणारांसाठी महत्वाची सूचना …

Spread the love

नवी दिल्ली: गेल्या दोन आर्थिक वर्षांमध्ये कोविड-19 महामारीमुळे सरकारने आयटीआर दाखल करण्याची मुदत वाढवली होती. मात्र, केंद्र सरकार मुदत वाढविण्याचा विचार करत नसल्याने यंदा परिस्थिती वेगळी आहे. सरकारचे हे पाऊल तीन वर्षांत प्रथमच पाहायला मिळणार आहे. महसूल सचिव तरुण बजाज यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की, “आतापर्यंत, इनकम  टॅक्स फाईल  करण्याची शेवटची तारीख वाढवण्याबाबत कोणतीही विचार नाही.”

आयकर (आय-टी) नियमांनुसार, वैयक्तिक करदात्यांनी या आर्थिक वर्षासाठी आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. हे असे करदाते आहेत ज्यांना त्यांच्या खात्यांचे ऑडिट करण्याची आवश्यकता नसते.

महसूल सचिव म्हणाले की, करदात्यांची सामान्य प्रतिक्रिया अशी आहे की रिटर्न फॉर्म भरणे खूप सोपे झाले आहे आणि परतावा देखील जलद मिळत आहे. कर विभागाने नवीन आयटी फाइलिंग पोर्टल सुरू केले आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे पोर्टल खूप मजबूत आहे आणि अतिरिक्त भार उचलू शकते.

महसूल सचिव तरुण बजाज यांनी पुढे म्हटले आहे कि , “गेल्या वेळी, आमच्याकडे शेवटच्या तारखेला 50 लाखांहून अधिक रिटर्न भरले होते. यावेळी,  1 कोटीसाठी तयार राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. जे शेवटच्या दिवसापर्यंत  रिटर्न परत फाईल करू शकतील.

गेल्या आर्थिक वर्ष 2020-21 (FY21) मध्ये, 31 डिसेंबर 2021 च्या विस्तारित तारखेपर्यंत सुमारे 5.89 कोटी ITR दाखल करण्यात आले होते. आयटीआरद्वारे, किथल्याही व्यक्तीला भारताच्या आयकर विभागाकडे कर जमा करावा लागतो.

आयटीआरमध्ये एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न आणि विशिष्ट आर्थिक वर्षात त्यावर भरावा लागणारा कर याविषयी माहिती असते.

जर एखाद्या व्यक्तीचे उत्पन्न सूट मर्यादेपेक्षा जास्त असेल तर त्याला कर विवरणपत्र भरावे लागेल. नवीन कर प्रणाली अंतर्गत, सूट मर्यादा ₹ 2.5 लाख ठेवण्यात आली आहे. जुन्या नियमानुसार, 60 वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींसाठी सूट मर्यादा ₹ 2.5 लाख आहे; 60 ते 80 वयोगटातील लोकांसाठी ₹ 3 लाख (ज्येष्ठ नागरिक); आणि 80 वर्षांवरील (सुपर ज्येष्ठ नागरिक) साठी ₹ 5 लाख.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!