Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : चर्चेतली बातमी : राजमुद्रेच्या प्रतिकृतीवरून विरोधक आणि सरकारमधील वाद थांबेना…

Spread the love

नवी दिल्ली :  नवीन संसद भवनाच्या छतावर राष्ट्रीय प्रतीक असलेल्या अशोक चिन्हाचे अनावरण झाल्यानंतर, विरोधी पक्षांनी सरकारवर राष्ट्रीय चिन्हाचे स्वरूप बदलल्याचा आरोप केला आहे आणि ते त्वरित बदलण्याची मागणी केली आहे. अशोकाच्या काळातील  ‘आकर्षक आणि राजस्वी शान’ असलेल्या सिंहांच्या जागी आक्रमक आणि हिंसक  सिंहांचे चित्रण करून राष्ट्रीय चिन्ह बदलण्यात आल्याचे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी नवीन संसद भवनाच्या छतावर राष्ट्रीय बोधचिन्हाचे अनावरण केले. आयोजित समारंभात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि राज्यसभेचे उपसभापती हरिवंश उपस्थित होते. दरम्यान संविधानाचे नियम मोडून विरोधी पक्षनेत्यांना कार्यक्रमाला निमंत्रित न केल्याबद्दलही  विरोधकांनी मोदींवर निशाणा साधला आहे.

हा मोदींचा नवा भारत आहे …

ज्येष्ठ वकील आणि कार्यकर्ते प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे कि , “गांधीपासून गोडसेपर्यंत, आमचे सिंह कृपापूर्वक आणि शांततेने बसलेले आहेत, सेंट्रल व्हिस्टा येथे निर्माणाधीन नवीन संसद भवनाच्या छतावर आक्रमक दात दाखवणाऱ्या सिंहांच्या नवीन राष्ट्रीय चिन्हापर्यंत. हा मोदींचा नवा भारत आहे.

काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश म्हणाले की, ‘सारनाथमधील अशोक स्तंभाच्या नवीन संसद भवनावर सिंहांचे स्वरूप आणि स्वभाव पूर्णपणे बदलणे हा भारताच्या राष्ट्रीय चिन्हाचा अपमान आहे’. तर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या महुआ मोईत्रा म्हणाल्या, “खर सांगायचे तर यामुळे सत्यमेव जयतेच्या अभावी “संघिमेव जयते”ची भावना पूर्ण झाली आहे.”

आम आदमी पार्टी (आप) ने देखील या उग्र आणि आक्रमक सिंहाच्या चिन्हावर टीका करताना म्हटले आहे कि , संविधानाच्या वारशात कोणालाही छेडछाड करण्याची परवानगी नाही. देशाच्या घटनात्मक परंपरेला धक्का बसत असल्याने अशा प्रकारची छेडछाड टाळली पाहिजे, असे पक्षाने म्हटले आहे.

इतिहासकार एस. इरफान हबीब यांनीही  संसदेच्या नव्या इमारतीच्या छतावर लावण्यात आलेल्या या राष्ट्रचिन्हावरही आक्षेप घेताना म्हटले आहे कि ,  “आमच्या राष्ट्रीय चिन्हाशी छेडछाड करणे पूर्णतः अनावश्यक आहे आणि ते टाळले पाहिजे. आपले सिंह इतके उग्र आणि आक्रमक का दिसत आहेत? १९५० मध्ये स्वतंत्र भारताने अशोक काळातील हे चिन्ह स्वीकारले आहे.

भाजपचा विरोधकांवर पलटवार

एकीकडे विरोधकांकडून हि टीका होत असताना , दुसरीकडे केंद्र सरकारने हे आरोप फेटाळून लावले आहेत.  पंतप्रधान नरेंद्र मोदींना लक्ष्य करण्याचे हे  एक राजकीय  ‘षडयंत्र’ असल्याचे भारतीय जनता पक्षाने म्हटले आहे. त्याचबरोबर या मुद्द्यावरून विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.

भाजपचे मुख्य प्रवक्ते आणि राज्यसभा सदस्य अनिल बलूनी यांनी विरोधकांवर प्रत्युत्तर देताना म्हटले की, विरोधकांच्या आरोपांचे मूळ कारण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या कार्यकाळात ब्रिटिशांनी १५० वर्षांपूर्वी बांधलेल्या जागेवर संसदेची इनवीन मारत बांधण्यात येत आहे त्याबद्दलची हि निराशा आहे. विरोधी पक्षांना या ना त्या निमित्ताने पंतप्रधान मोदींना लक्ष्य करायचे आहे. लोकांची दिशाभूल करून सामाजिक वातावरण  दूषित करण्याचा हा केवळ डाव आहे. तर भाजपचे राष्ट्रीय माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे प्रभारी अमित मालवीय म्हणाले, “कोणताही बदल झालेला नाही. विरोधक  2D प्रतिमेची तुलना भव्य 3D रचनेसोबत करीत आहेत.

राष्ट्रचिन्हावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी मंगळवारी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आणि सारनाथ येथील राष्ट्रचिन्हाचा आकार वाढवायचा किंवा संसदेच्या नवीन इमारतीवरील बोधचिन्हाचा आकार कमी करायचा यात काहीही अंतर नाही.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!