Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BJPNewsUpdate : पक्षाचा आदेश म्हणून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणे शिरोधार्य : देवेंद्र फडणवीस

Spread the love

मुंबई : मी या सरकारचा भाग नसेन, मात्र या सरकारची माझ्यावर जबाबदारी असेन, असे फडणवीस यांनी जाहीर केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऐन शपथविधीच्यावेळी दोन खुर्च्या लावलेल्या असतं कोणाच्याही ध्यानीमनी नसताना अचानक भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांचा ट्विटरवर आदेश आला आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गळयात उपमुख्यमंत्रीपदाची माळ पडली आणि सर्वांच्याच भुवया उंचावल्या. याचा खुलासा करताना एक सच्चा कार्यकर्ता म्हणून मी पक्षाच्या आदेशाचे पालन करतो, असे ट्विट करून फडणवीस यांनी आपली बाजू जनतेसमोर मांडली आहे. 

शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर  आता राज्याच्या नेतृत्वाची धुरा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे सांभाळणार आहेत.  विशेष म्हणजे एकनाथ शिंदे हे राज्याच्या नवे मुख्यमंत्री असतील, भाजपा पक्षाचा या सरकारला पाठिंबा असेल, अशी घोषणा करताना , मी या सरकारचा भाग नसेन, मात्र या सरकारची माझ्यावर जबाबदारी असेन, असे म्हटले होते ठरलेही तसेच होते मात्र भाजपच्या दिल्लीमधील नेतृत्वाने नवीन आदेश देत  देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री होतील, जाहीर करण्यात आले.

शहा – नड्डा यांचे ट्विट

राज्यातील भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री होऊन राज्यात सहभागी व्हावे असे विनंतीवजा आदेश भाजपाचे केंद्रीय नेते अमित शाह आणि जेपी नड्डा यांनी पाठवल्यानंतर फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास होकार दिला आणि हा शपथविधी पार पडला.

देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट

दरम्यान “एक सच्चा कार्यकर्ता म्हणून मी पक्षाच्या आदेशाचे पालन करतो. ज्या पक्षाने मला सर्वोच्च पदापर्यंत पोहोचवले, त्याचा आदेश माझ्यासाठी सर्वोपरि आहे. एक प्रामाणिक कार्यकर्ता, म्हणून पक्षाच्या आदेशाचे मी अनुसरण करतो. ज्या पक्षाने माला सर्वोच्च पद दिले त्या माझ्या पक्षाचा आदेश पाळणे मला शिरोधार्य आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!