Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaWorldNewsUpdate : कचऱ्याच्या गाडीवर पंतप्रधानांचा फोटो , काँग्रेसकडून निषेध , सोशल मीडियावर आखाती देशांविरुद्ध मीडियावर संताप

Spread the love

नवी दिल्ली : भाजप नेत्यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे अरबी देशातील कतार, कुवेतने आणि आता सौदी अरेबियाने आपला निषेध व्यक्त केला आहे. मुस्लिम राष्ट्रातील हा असंतोष लक्षात घेऊन कतारच्या दोहा येथे भारतीय राजदूत दिपक मित्तल यांच्यामार्फत भारताने  आपली भूमिकाही स्पष्ट केली आहे . परंतु या वादाच्या विरोधात  अरब देशातील कचराकुंडीच्या गादीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो लावण्यात आल्याने भारतात संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेसने हा फोटो ट्विट करत अरब देशातील या कृतीचा तीव्र शब्दात धिक्कार केला आहे. सोशल मीडियावर या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत.


 याबाबत काँग्रेस प्रवक्ते सुरेंद्र राजपूत यांनी एक फोटो ट्विट केला असून आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे कि , मोदींना आमचा विरोध देशात आहे, मोदी आणि भाजपला आणि देशात लोकशाही मार्गाने पराभूत करूच. मात्र, कुठल्या अरब देशातील कचराकुंडीवर आमच्या देशाच्या पंतप्रधानांचा फोटो कदापी स्वीकार  होणार नाही. प्रत्येक भारतीय नागरिकांनी याचा विरोधच केला पाहिजे. परराष्ट्रमंत्री डॉ. जयशंकर आणि परराष्ट्र खात्याने याची दखल घ्यावी. अंबरीष गुप्ता यांनी हे ट्विट रिट्विट केले आहे.

दरम्यान, मोहम्मद पैंगबर यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्यामुळे भाजपा प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तर दिल्लीतील भाजपा नेते नवीन कुमार जिंदाल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. प्रेषित पैंगबर मोहम्मद यांच्यावरील वादग्रस्त विधानामुळे बहरीन, कतार, कुवेत, इराण,ओमान आणि ऑडी अरबसारख्या आखाती देशात भारताविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!