Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : GoodNews : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी खुशखबर …

Spread the love

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने आज सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पीएम मोदींनी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं आज ३० मार्च रोजी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आणि महागाई सवलत वाढवून ३४ टक्क्यांपर्यंत केली आहे. 

केंद्र सरकारने जुलै २०२१ मध्ये केंद्राने  महागाई भत्ता आणि महागाई सवलत १७ टक्क्यांवरून २८ टक्क्यांपर्यंत वाढवली. मात्र कोरोना संसर्गामुळे सरकारने  जवळपास दीड वर्षांपासून डीए बंद केला होता. ऑक्टोबर २०२१ मध्ये केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांचा डीए ३ टक्क्यांच्या आणखी वाढीसह ३१ टक्क्यांपर्यंत वाढला. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुधारित डीए जुलै २०२१ पासून लागू झाला आहे. १ जुलै २०२१ पासून केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांसाठी महागाई भत्तादेखील 31 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.

या निर्णयामुळे केंद्र सरकारच्या ज्या कर्मचाऱ्याला १८,००० रुपये दरमहा मिळतात, त्याच्या टेक-होम पगारात ३ टक्के वाढ मिळेल. ३४ टक्के डीए सह, त्याचा पगार दरमहा ६,१२० रुपयांनी वाढेल. महागाई भत्ता मूळ वेतनाशी जोडलेला असल्याने , DA वाढल्यानं केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या मासिक भविष्य निर्वाह निधी (पीएफ) आणि ग्रॅच्युइटीच्या रकमेतही वाढ होईल. त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी पीएफ, प्रवासी भत्ता आणि ग्रॅच्युइटी वाढणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!