AurangabadCrimeUpdate : कामाचे आमिष दाखवून मजूर महिलेचे दोन महिने शोषण, आरोपी फरार

औरंगाबाद – मजूर महिलेला कामाचे अमिष दाखवत शहरातील एका खोलीत तब्बल दोन महिने डांबून ठेवत शोषण केल्या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात ठेकेदारासह अन्य एकावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.संभाजी शिंदे असे निष्पन्न आरोपीचे नाव आहे तर फरार आरोपीचे नाव पिडीतेला सांगता आले नाही.निष्पन्न आरोपी ठेकेदार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि . २६ नोव्हेंबर २१ रोजी आरोपी शिंदे याने मजूरांना वाहून नेणार्या व्हॅन मधे पिडीतेला कामाचे अमीष दाखवून शेंद्रा औद्योगिक परिसरात तिच्या १४ वर्षाच्या मुलासहित नेले दिवसभर कागदी कप बनवणार्या कंपनीत काम दिल्यानंतर संध्याकाळी ५वा. पिडीतेला मुलासहित क्रांतीचौक भागात आणले. तेथील एका खोलीत डांबून ठेवले व आरोपी शिंदे त्याच्या सहकारी मुलाला घराबाहेर ठेवून हे दोघेही पीडित महिलेवर आळीपाळीने अत्याचार करीत. शेवटी १५जानेवारी २२ रोजी पिडीतेने सुटका करुन घेत सोमवारी मुकुंदवाडी पोलिसांना तक्रार दिली. पुढील तपास पोलिसनिरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय मिरधे करंत आहेत.