Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaWorldUpdate : कोणी काहीही म्हणो , कोरोनाच्या ओमायक्रॉनला हलक्यात घेऊ नका…

Spread the love

वॉशिंग्टन : कोरोना आणि ओमायक्रॉन च्या बाबतीत अनेक समज गैरसमज असले तरी जगभरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सर्वत्र मोठी वाढ होत आहे. यामध्ये चिंताजनक बाब म्हणजे, ओमायक्रॉन रुग्णांच्या वाढीबरोबच या रुग्णाच्या मृत्यूंच्या संख्येतही जवळपास १२ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.त्यामुळे ओमायक्रॉनला हल्ल्यात घेण्याऐवजी गांभीर्याने घेऊन कोणी काहीही म्हटले तरी नागरिकांनी आपली काळजी घेणे गरजेचे झाले आहे.


याबाबत ‘एएफपी’ने दिलेल्या वृत्तानुसार, या आठवड्यात दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या गेल्या आठवड्याच्या तुलनेत ४४ टक्क्यांनी वाढलीआहे. ही रुग्णसंख्या विक्रमी २.७८ दशलक्षांपर्यंत पोहोचली आहे. या भयंकर परिस्थितीसाठी आणि आकडेवारीसाठी ‘ओमिक्रॉन’ व्हेरियंट जबाबदार असल्याचे समोर येत आहे. यात, आशियामध्ये २१० टक्के, मध्य पूर्वमध्ये १४२ टक्के, लॅटिन अमेरिका-कॅरिबियन प्रदेशात १२६ टक्के आणि ओशिनियामध्ये ५९ टक्कं रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

दरम्यान अमेरिका आणि कॅनडामध्ये कोरोना रुग्णसंख्येत ३१ टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत असून फिलिपिन्समध्येही रुग्णसंख्येत सर्वाधिक ३२७ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. यानंतर भारतात ३२१ टक्के, कोसोवोमध्ये ३१२ टक्के, ब्राझीलमध्ये २९० टक्के आणि पेरूमध्ये २८४ टक्के वाढ झाली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!