Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharshtraUpdate : चिंताजनक : राज्यात आज दिवसभरात तब्बल ३६ हजार २६५ नव्या रुग्णांची नोंद

Spread the love

मुंबई : राज्यात आज दिवसभरात तब्बल ३६ हजार २६५ नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली असून आजच्या रुग्णवाढीसह राज्यातील सक्रिय रुग्णांचा आकडा आता १ लाख १४ हजार ८४७ इतका झाला आहे. तर १३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ८,९०७ रुग्णांनी आज कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. दरम्यान राज्यातील ओमायक्रॉनच्या रुग्णांचा आकडा देखील वाढताना दिसत आहे. राज्यात आज ७९ नवे ओमायक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्यातील ओमायक्रॉनच्या एकूण रुग्णांचा आकडा ८७६ इतका झाला आहे. तर बरं झालेल्या रुग्णांचा आकडा ३८१ इतका झाला आहे.

विशेष म्हणजे राज्यात सर्वाधिक रुग्णवाढ मुंबईत नोंदवली जात आहे. राज्यातील आजच्या ३६ हजारांच्या रुग्णसंख्येत २०,१८१ रुग्ण तर एकट्या मुंबईत आढळून आले आहेत. मुंबईत सध्या ७९,२६० सक्रिय रुग्ण आहेत. एका दिवसात मुंबईतील रुग्णसंख्येचा आकडा ५ हजारांनी वाढल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. मुंबईचा आजचा पॉझिटिव्हिटी दर तब्बल २९.९० टक्के इतका नोंदविण्यात आला आहे. मुंबईत बुधवारी तब्बल १५,१६६ नवे कोरोना रुग्ण आढलले होते. आज हाच आकडा थेट २० हजारांच्यावर पोहोचला आहे. मुंबईतील धारावी परिसरातून आज १०७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर दादरमध्ये २२३ आणि माहित परिसरातून ३०८ रुग्णांची वाढ झाली आहे. मुंबईत गेल्या २४ तासांत ४ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्याची स्थिती

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 28 जणांना (मनपा 25, ग्रामीण 03) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 46 हजार 257 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 128 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 50 हजार 287 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 658 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 372 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (111)

शक्ती नगर 2, सिडको 1, उल्का नगरी 2, कांचनवाडी 1, भूईवाडा 1, एन-नऊ येथे 1, पीसादेवी 1, पडेगाव 4, रेल्वेस्टेशन 1, कमलनयन बजाज दावखाना 1, वेंदात नगर 3, नक्षत्रवाडी 1, बीड बायपास 4, रामनगर 1, एन-वन येथे 1, शेंद्रा 1, अविष्कार कॉलनी 1, एन- दोन येथे 1, एन-चार येथे 3, भवानीनगर 1, आरेफ कॉलनी 1, टी.व्ही सेंटर 1, उस्मानपुरा 3,आरपीएफ 1, आकाशवाणी 1, प्रताप नगर 1, म्हाडा कॉलनी दर्गा रोड 1, बन्सीलाल नगर 1, खडकेश्वर 1,शिवाजीनगर 2, विमानतळ 1, चाणक्यपुरी 1, एमआयटी हॉस्पिटल 1, गणेश नगर 1, शहानुरवाडी 1, जुना बाजार 1, सातारा परिसर 1, विद्युत कॉलनी 1, चिकलठाणा 1, श्रेय नगर 1, अन्य 56

ग्रामीण (17)

औरंगाबाद 12, कन्नड 2, खुलताबाद 1, पैठण 2

आपलं सरकार

Click to listen highlighted text!