AurangabadCrimeUpdate : पान टपरी चालकाकडे ७० हजारांचा गांजा, राजरोस सुरु होती विक्री

औरंगाबाद – जवाहरकॉलनीतील प्रिन्स पान सेंटरवर राजरोसपणे गांजा विक्री करणाऱ्या टपरीचालकाला गुन्हेशाखेने ६३ हजारांचा गांजा व् ५ हजारांचा वजन काटा असे एकुण ६८ हजारांचा मुद्देमालासह अटक केली आहे याप्रकरणी जवाहरनगर ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सचिन राजू ठोंबरे (२९) रा. शास्त्रीनगर असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्या ताब्यातून ६ किलो ३६० ग्रॅएम गांजा जप्त करण्यात आला. वरील कारवाई पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कल्याण शेळके , पोलीस कर्मचारी रमाकांत पटारे, शेख हबीब,किशोर खण्डागले संजीवनी शिंदे यांनी सहभाग घेतला होता.