Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @ औरंगाबाद उपक्रमातून शैक्षणिक प्रगती साध्य करणार : उदय सामंत

Spread the love

महाविद्यालय व विद्यापीठ पूर्ण क्षमतेने सूरु करण्यासाठी संपूर्ण लसीकरण करण्याचे आवाहन
महाविद्यालयास दिव्यांगाना सेवा सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या सूचना

औरंगाबाद : उच्च व तंत्र शिक्षण विभाग@औरंगाबाद या उपक्रमांतर्गत मंत्रालयाचे प्रशासकीय यंत्रनेद्वारे शैक्षणिक समस्या सोडवून शिक्षणात अद्ययावतपणा व गुणवत्ता याबरोबरच नवनवीन उपक्रमाची अमंलबजावणी करुन शैक्षणिक प्रगती करणार असल्याचे प्रतिपादन डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठातील नाटयगृह आयोजित केलेल्या कार्यक्रमात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.

या कार्यक्रमास डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले, आमदार अंबादास दानवे, आमदार विक्रम काळे,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, उच्च तंत्र शिक्षण संचालक धनराज माने, डॉ.अभय वाघ, कला संचालक राजीव मिश्रा, विद्यापीठाच्या कुलसचिव जयश्री सुर्यवंशी याबरोबरच विद्यापीठातील विभागप्रमुख, प्राध्यापक विद्यार्थी आणि पालक या कार्यक्रमास उपस्थित होते.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय@औरंगाबाद या अभिनव कार्यक्रमात विविध शैक्षणिक तसेच प्राध्यापक विद्यार्थी तक्रारीचे निरसन करण्यात आले. यामध्ये वेतननिश्चतीमधील फरक प्राध्यपक व शिक्षकेत्तर पदभरती संशोधन संदर्भात ग्रंथालयास अनुदान, सातवा वेतन आयोगप्रमाणे वेतन निश्चती, पंजाबराव देशमुख विद्यार्थी वस्तीगृह भत्ता, विद्यापीठाचे रोष्टर तपासणी, दिव्यांग प्राध्यापक व विद्यार्थ्यांना सहज सेवा उपलब्धता, महाज्योतीच्या उपक्रमाची अमंलबजावणी संर्वगनिहाय पद भरती, प्राध्यापाकांचे तासिका तत्वावर मानधनात वाढ, नवीन वस्तीगृहची उभारणीची मागणी, समाजकार्य अभ्यासक्रम व पत्रकारीता या विभागातील विद्यार्थी प्रवेश क्षमता वाढ या इत्यादी बाबीच्या मागणी व अडचणी बाबत संबंधित तक्रारदारासमवेत मंत्री उदय सामंत यांनी संवाद साधून प्रसंगी तक्रार अर्ज स्विकृत करुन उपाय योजना करण्याचे उपस्थित संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत दिले.

यापूर्वी प्राप्त झालेल्या 135 अर्जांपैकी 116 अर्ज सकारात्मकपणे निकाली काढण्यात आले. यापूर्वी औरंगाबाद विभागात प्राप्त् झालेल्या एकूण 3769 प्रकरणापैंकी 3458 प्रकरणे निर्णयित करण्यात आली, या पदरभरतीबाबत पुढील आठवाड्यात आढावा बैठक घेण्यात येईल असे सांगून डॉ.बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील क्रीडा संचालक पद भरण्यास लवकरच मंजूरी देण्यात येईल अशी ग्वाही यावेळी सामंत यांनी दिली. तसेच कोविडमुळे पालक ह्यात नसलेल्या विद्यार्थ्याची सर्व सत्रांची फि माफ करण्याच्या निर्णय घेण्यात आलेला आहे याबरोबरच दुष्काळग्रस्त क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या फि माफीसाठी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

यावेळी मान्यवराच्या उपस्थित उदय सामंत यांच्या हस्ते अनुकंपा तत्वावर नौकरीचे नियुक्ती आदेशाचे वितरण प्रातिनिधीक स्वरुपात झाले. यामध्ये प्रमोद लाहोटी, श्रीमती गीता कऱ्हाळे, दिपक सातपूते, किशोर देशपांडे, देवेंद्र काळे, सौदागर भोसले, स्वप्नील तरमोडे, कृष्णा शेवते, उमेश साळुंखे याचबरोबर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमात अंकित तेलंगे, शुभम गाढवे, ऐश्वर्या भवर, निर्मल पांडे, उत्कृष्ट NSS विद्यार्थ्यामध्ये मनोज जगडे, नसीम पटेल, स्वराज हिवाळे, सुमित जाधव, वसुंधरा झाडगावकर, प्रियंका ठोसर, अनिता पगारे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या शेवटी शासकीय कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय देयकाचे धनादेशाचे वितरण करण्यात आले. यामध्ये एस.एच. चव्हाण, बाबासाहेब काळे, छत्रगुण मोरे, राजेश जगताप यांचा समावेश होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!