UttarPradeshNewsUpdate : लखीमपूर खिरी प्रकरणात मंत्रीपूत्र आशिष मिश्रा पोलिसांसमोर हजर

Advertisements
Advertisements
Spread the love

लखीमपूर खीरी :  न्ययालयाने उत्तर प्रदेश पोलिसांना खडसावल्यानंतर गेल्या रविवारी ३ ऑक्टोबर  रोजी आंदोलक शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप असणारा उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी हत्याकांडातील मुख्य आरोपी आणि केंद्रीय मंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा दोन समन्स जरी केल्यानंतर आज अखेर गुन्हे शाखेच्या पोलीस अधिकऱ्यांसमोर हजार झाला आहे. या चौकशीनंतर आशिष मिश्राला अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, परिस्थितीचे  गांभीर्य लक्षात घेता शुक्रवारी सायंकाळपासून पुन्हा एकदा लखीमपूरमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली असल्याचे वृत्त आहे.

Advertisements

गेल्या ७ दिवसापूर्वी घडलेल्या घटनेप्रकरणी आशिष मिश्रा याला शुक्रवारी सकाळी १०.०० वाजता चौकशीसाठी बोलावण्यात आले  होते . परंतु, आरोपीने  वेळ मागितल्यानंतर त्याला आज सकाळी ११.०० वाजेपर्यंतची मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपायच्या अर्धा तास आधीच आज आशिष मिश्रा गुन्हे शाखेच्या  कार्यालयात दाखल झाला. दरम्यान शुक्रवारी झालेल्या सुनावणीत ‘हत्या प्रकरणातील प्रत्येक आरोपीला प्लीज चौकशीसाठी या’ अशी विनंती केली जाते का? असा प्रश्न विचारत सर्वोच्च न्यायालयाने  उत्तर प्रदेश पोलिसांना खडसावले होते.

Advertisements
Advertisements

दरम्यान यापूर्वी, आम्ही नोटिशीचा सन्मान करून तपासात सहकार्य करणार आहोत, आशिष मिश्रा आज पोलिसांसमोर हजर होईल, असं त्याचे कायदेशीर सल्लागार अवधेश कुमार यांनी म्हटले होते . आशिष मिश्रासाठी क्राईम ब्रान्चने  ३२ प्रश्नांची एक यादी तयार केली असून  त्याच्या चौकशीची व्हिडिओग्राफीदेखील केली जाणार आहे. दुसरीकडे, भाजप कार्यालयात त्यांच्या समर्थकांनी गर्दी केली आहे. आशिष मिश्रा निर्दोष असल्याचं भाजप समर्थकांचे  म्हणणे आहे. ‘आम्हाला माहीत आहे की तो निर्दोष  आहे. घटना घडली तेव्हा आशिष घटनास्थळी नव्हता. त्याला केवळ चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे’, अशी प्रतिक्रिया केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांनी दिली.

Leave a Reply

आपलं सरकार