Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarthawadaNewsUpdate : विम्याच्या नावाखाली शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा फडणवीस यांचा आरोप

Spread the love

उस्मानाबाद : ‘भाजप सरकारच्या काळात जलयुक्त शिवार योजना राबवण्यात आली होती. त्यामुळे नद्यांचे खोलीकरण करण्यात आले होते. पण, आज योजना बंद केल्यामुळे नद्यांचा महापूर आला’, असा आरोप भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला. देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्यात दाखल झाले. करजखेडा गावात त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. कर्जखेडा गावातील पूरग्रस्त भागाची त्यांनी पाहणी केली.

आपल्या दौऱ्यात पत्रकारांशी बोलताना फडणवीस म्हणाले कि , उस्मानाबाद जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अडीच लाख हेक्टरपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. अद्याप शेतकऱ्यांना सरकारकडून कोणतीही मदत नाही. विमा एजंट गावागावात फिरत आहे. शेतकऱ्यांकडून ५०० रुपये घेऊन नुकसानीचा टका वाढण्याचे आमिष देत आहे. ५०० रुपये दिले तर ६० टक्के नुकसान दाखवतो आणि नाही दिले तर २० टक्के नुकसान दाखवतो, अशा प्रकारे फसवणूक सुरू आहे, असा दावा फडणवीस यांनी केला आहे. तसेच, लोकांशी आम्ही चर्चा केली, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तेव्हा आमच्या काळात आम्ही जलयुक्त शिवार योजना राबवली होती. या योजनेतून नदीचे खोलीकरण करण्यात आले होते. ज्यांनी केले त्यामुळे काही जणांच्या शेती वाचली आहे. ही योजना मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे. पण, या सरकारने जलयुक्त शिवार योजना बंद केली. त्यामुळे खोलीकरण आणि रुंदीकरण बंद झाले, त्यामुळे या ठिकाणी पाणी साचत आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला.

दरम्यान राज्य सरकारने शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी, विम्याची मदत करावी, दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांच्या अकाऊंटमध्ये जमा करावे, अशी मागणीही फडणवीस यांनी केली. याआधी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर हे दोन्ही नेते रविवारपासून लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. अहमदपूर, चाकूर आणि लातूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीचं झालेलय नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर आज ते निलंगा आणि औसा तालुक्यातील शेतीच्या नुकसानाची पाहणी केली. निलंगा तालुक्यातील गौर मसलगा येथे मसलगा प्रकल्पाच्या पाण्यामुळे शेकडो एकर शेतीत पाणी साचले आहे. तर या भागातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे थेट शेतीच्या बांधावर जाऊन पाहणी करत सरकारला मदत देण्यासाठी भाग पाडणार असल्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांना दिले .

आपलं सरकार

Click to listen highlighted text!