Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

West Bengal By poll Results Update : ताजी बातमी : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आघाडीवर

Spread the love

कोलकता : पश्चिम बंगालमध्ये होत असलेल्या तीन विधानसभा मतदार संघाची मतमोजणी सुरु असून या तिन्हीही जगावर ममताच ताबा मिळवतील अशी शक्यता आहे. भवानीपुर मतदार संघात मुख्यमंत्री ममता बनर्जी यांना ९ व्या फेरीच्या अखेरीस ३७,५०४ मते मिळाली आहेत. तर भाजपच्या उमेदवार प्रियंका टिबरेवाल यांना केवळ ८६७९ मते मिळाली आहेत तर सीपीएम चे श्रीजिब बिस्वास यांना केवळ ८७५ मते मिळाली आहेत.११४ मते मतदारांनी नोटा या बटनावर टाकली आहेत. या फेरीत ममतांनी २८८२५ मतांची आघाडी घेतली असून बंगालच्या समसेरगंज और जांगीपुर या जागेवरही टीएमसीचे उमेदवार पुढे आहेत.

आज रविवारी सकाळी ८ वाजल्यापासून निवडणूक आयोगाने मतमोजणी सुरु केली आहे.दरम्यान तृणमूलच्या नेत्यांनी रविवारी मतमोजणीच्या काही तास आधीच ममता बॅनर्जी पोटनिवडणूक जिंकतील असे म्हटले आहे. मार्च-एप्रिल विधानसभा निवडणुकीत भोवानीपूरची जागा जिंकलेल्या शोभनदेव चट्टोपाध्याय यांच्यापेक्षा जास्त फरकाने त्या निवडणून येतील असे तृणमूलने म्हटले आहे.

दरम्यान ओडिशाच्या पिपली विधानसभा मतदारसंघात बीजेडीचे रुद्रप्रताप महारथी आघाडीवर आहेत. तर बीजेपीचे आश्रित पटनायक दुसऱ्या क्रमांकावर आहेत. गेल्या निवडणुकीत हि जागा बीजू जनता दलानेच जिंकली होती. बंगालच्या जांगीपुरच्या जागेवर टीएमसीचे जाकिर हुसैन आघाडीवर असून भाजपचे सुजित दास दुसऱ्या क्रमांकावर आहेत.तर समसेरगंजच्या जागेवरही टीएमसीचे मीरुल इस्लाम पुढे आहेत तर भाजपचे उमेदवार मिलन घोष दुसऱ्या स्थनावर आहेत. मागच्यावेळीही या जागा तृणमूलच्याच ताब्यात होत्या.

गेल्या निवडणुकीत झाला होता पराभव

मागच्यावेळी झालेल्या निवडणुकीत नंदीग्राममधून ममता बॅनर्जी यांचा निसटता पराभव झाला होता. मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यास सहा महिन्यात निवडून येणे आवश्यक असल्याने हि पोटनिवडणूक जिंकणे ममता यांच्यासाठी आवश्यक आहे. त्यामुळे भवानीपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी ३० सप्टेंबर रोजी मतदान पार पडल्यानंतर आता सर्वांच्या नजरा आज येणाऱ्या निकालाकडे लागल्या आहेत.

दरम्यान विधानसभा निवडणुकीत तृणमूलने बंगालच्या २९४ जागांपैकी २१३ जागा जिंकल्या आणि भाजपाने ७७ जागांवर विजय मिळवला होता. पण पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील नंदीग्राम येथे बॅनर्जी यांचा भाजपाच्या सुवेंदू अधिकारी यांनी पराभव केला होता. त्यामुळे चट्टोपाध्याय यांनी भोवानीपूरची जागा रिकामी केली जेणेकरून बॅनर्जी त्यांच्या जुन्या मतदारसंघातून पुन्हा निवडणूक लढवू शकतील आणि मुख्यमंत्रीपदी राहू शकतील.

३० सप्टेंबरच्या पोटनिवडणुकीत भोवानीपूरच्या २,०६,३८९ मतदारांपैकी केवळ ५७.०९ टक्के मतदान झाले. तर २६ एप्रिल रोजी चट्टोपाध्याय यांनी निवडणूक लढवली तेव्हा हा आकडा ६१.७९ टक्के होता. चट्टोपाध्याय २८,७१९ मतांच्या फरकाने विजयी झाले होते. तृणमूल नेत्यांनी शनिवारी रात्री दावा केला की मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या ५०,००० पेक्षा जास्त मतांनी जिंकणार आहेत.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!