Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : कृषी कायद्याला विरोध , दिल्लीत शेतकऱ्यांचा चक्क जाम , ११ जणांना अटक

Spread the love

नवी दिल्ली : मोदी सरकारने केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन चालूच असून शेतकऱ्यांच्या विरोधाची दखल न घेता मोदी सरकारकडून संख्येच्या बळावर संसदेत नवे कृषी कायदे संमत करून घेण्याच्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. परंतु, राजधानी दिल्लीच्या सीमेवर अजूनही शेतकरी कृषी कायद्यांविरुद्ध ‘काळा दिवस’ पाळत आहेत.

दरम्यान शेतकरी नेते राजेश टिकैत यांनी म्हटले आहे कि , जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपयंत हे आंदोलन चालूच राहील, १० वर्षापर्यंतही आमच्या मागणीसाठी आम्ही आंदोलन करू शकतो असा इशाराही टिकैत यांनी दिला. आम्हाला आमचा हक्क मिळाला पाहिजे भीक नाही असेही टिकैत यांनी म्हटले आहे.

शिरोमणि अकाली दलाच्या नेतृत्वाखाली आज संसदेपर्यंत एका मार्चचे आयोजन करण्यात आले आहे परंतु, दिल्ली पोलिसांनी अनेक ठिकाणी बॅरिकेडिंग उभारत रस्ते बंद करून आंदोलकांचा मार्ग रोखून धरला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंदोलकांना मार्चची परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. दरम्यान या आंदोलनामुळे दिल्लीत कलम १४४ लागू करण्यात आले आहे. आंदोलकांनी पोलिसांची ही कारवाई ‘अघोषित आणीबाणी’ असल्याचा आरोप केला आहे. सुखबीर बादल यांनी यावेळी काँग्रेसवरही टीका केली आहे.

बेकायदा मोर्चा काढल्यामुळे अकाली दलाचे सुखबीर बादल, हरसिमरत कौर बादल यांच्यासह ११ नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दिल्लीत ठिकठिकाणी आंदोलकांनी रास्ता जाम केला आहे. दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं पंडित श्रीराम शर्मा आणि बहादूरगड सिटी मेट्रो स्टेशनचा आत आणि बाहेर जाण्याचा मार्ग बंद केला आहे. दिल्लीत अनेक मार्ग बंद करण्यात आल्याने रस्ते जाम झाले आहेत. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग ९ आणि राष्ट्रीय महामार्ग २४ वर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढली आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!