Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : परमवीर सिंह यांच्यासह काही अधिकाऱ्यांविरोधात आणखी एक खंडणीचा गुन्हा

Spread the love

मुंबई  : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या विरोधात गुन्ह्यांची मालिकाच सुरु असून परमवीर सिंह यांच्यासह काही अधिकाऱ्यांविरोधात खंडणी वसुल केल्याची तक्रार एका क्रिकेट बुकीने दाखल कली आहे. ठाणेनगर पोलीस ठाण्यात सोलू जलान आणि केतन तन्ना यांनी ही तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे परमवीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ झाल्याचे  दिसून येत आहे.


या बाबतची अधिक माहिती अशी कि  , क्रिकेट बुकींनी केलेल्या तक्रारीनुसार, एका खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देऊन परमवीर सिंह आणि त्यांच्या टीमने कोट्यवधी रुपयांची खंडणी वसुल केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. परमवीर सिंह आणि त्यांच्या तत्कालीन खंडणी विरोधी पथकाच्या अधिकाऱ्यांविरोधात गुरुवारी जलान याने याबाबत लेखी तक्रार दाखल केली आहे.

यापूर्वीही  मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यावर खंडणीचा आरोप आहे. त्यानंतर आता एका क्रिकेट बुकीने परमवीर सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ठाणे नगर पोलिसांनी उद्या पुन्हा केतन तन्ना आणि सोनू जलान यांना बोलावले आहे. त्याशिवाय उद्या परमवीर सिंग आणि प्रदीप शर्मा याच्या खंडणी विरोधी पथक टीमवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता ठाणे पोलिस काय पाऊल उचलणार हेच पाहणे गरजेचे आहे..

दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान आता परमबीर सिंह यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासासाठी मुंबई पोलिसांकडून एसआयटीची नेमणूक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. परमबीर सिंह आणि इतर ५ पोलीस अधिकाऱ्यांवर मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एसआयटीची नेमणूक केली आहे. मरीन ड्राईव्ह येथे परमबीर सिंह आणि पोलीस दलातील पाच अधिकाऱ्यांविरुद्ध १५ कोटींची खंडणी मागितल्या प्रकरणी भाईंदर येथील बिल्डर श्यामसुंदर अग्रवाल यांनी गुन्हा नोंदवला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!