Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ , न्यायालयाकडून तात्काळ दिलासा नाहीच !!

Advertisements
Advertisements
Spread the love

अनिल देशमुख आणि त्यांच्या मुलाविरुद्ध ईडीचे नवे समन्स

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि त्यांचा मुलगा हृषिकेश देशमुख यांना कथित मनी लाँडरिंग प्रकरणी चौकशीसाठी नवीन समन्स जारी केले आहेत. त्यांना सोमवारी हजर राहण्यास सांगितले आहे.

Advertisements

दरम्यान ईडी प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना तात्काळ दिलासा मिळालेला नाही. ३ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालय प्रोटेक्शन याचिकेवर विचार करेल. मनी लाँडरिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालय मंत्र्यांना कोणताही दिलासा देणार नाही. त्यांच्या खटल्याची चौकशी करणाऱ्या अंमलबाजवणी संचालनालयाच्या (ईडी) समन्सविरोधात राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना आव्हान दिले होते. आपल्यासंदर्भातील कार्यवाही “दुर्दैवी” असल्याचा दावा देशमुख यांनी केला होता.

Advertisements
Advertisements

या सर्व प्रकरणात राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आता आणखी वाढ होण्याची चिन्ह दिसत आहेत. सरकारी तपास यंत्रणा आता आपला दिवसेंदिवस अधिकच घट्ट करत आहेत. १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणी सीबीआयकडून अनिल देशमुख यांच्याशी संबंधित असलेल्या १२ ठिकाणांवर नुकतीस छापेमारी केली गेली आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, सांगली व अहमदनगर येथील ठिकाणांचा समावेश आहे. तर,अहमदनगर आणि मुंबईमध्ये डीसीपी राजू भुजबळ यांच्या घरी आणि पुणे, मुंबईत एसीपी संजय पाटील यांच्या निवासस्थानी छापेमारी करण्यात आली होती.

दरम्यान या आधीच भ्रष्टाचाराच्या आरोपप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिलेला आहे. देशमुखांवरील आरोपांची सीबीआयतर्फे चौकशी सुरू आहे. अशा वेळी न्यायालयाचा हस्तक्षेप हा सत्य उघड करण्यातील अडथळा ठरू शकतो. त्यामुळे सीबीआयला सत्य शोधण्यापासून रोखले जाऊ शकत नाही, असे न्यायालयाने देशमुख यांची याचिका फेटाळताना स्पष्ट केले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!