Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : नाशिकच्या नोटांच्या छापखान्यातून तब्बल  पाच लाख रुपयांच्या नोटा गायब

Spread the love

नाशिकः येथील नोटांच्या छापखान्यातून तब्बल  पाच लाख रुपयांच्या नोटा गायब झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आज संध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. दोन आठवड्यापूर्वी ही घटना उघड झाली होती. कडेकोट सुरक्षाव्यवस्था असतानाही पाच लाख रुपये कुठे गेले? याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या प्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. गुन्ह्याची नोंद करण्यासाठी नोट प्रेसमधील अधिकाऱ्यांची मध्यरात्रीपर्यंत धावपळ सुरु होती.  नोट प्रेसमधून पाच लाखांच्या नोटा गायब होण्यामागे घातपात किंवा मोठा घोटाळा असल्याची भीती व्यक्त होत आहे.

या प्रकरणात ५०० रुपयांच्या नोटांचे १० बंडल गायब झाल्याची माहिती सध्या समोर येत आहे. करन्सी नोट प्रशासन या प्रकाराची गोपनीय चौकशी केली आहे. प्रेस नोट प्रशासनानं अंतर्गत चौकशी करुनही पाच लाखांचा तपास लागला नसल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, कडेकोट बंदोबस्तात नोटछपाई सुरु असतानाही नोटा गायब झाल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे. नाशिक प्रेसमध्ये दहा, वीस, पन्नास, शंभर व पाचशेच्या नोटांची छपाई होते. नाशिक प्रेसमध्ये दिवसाला १५ ते १८ दशलक्ष नोटांची छपाई होते. नाशिक प्रेसमधील नोटा ट्रक आणि रेल्वे वॅगनने रिझर्व्ह बँकेच्या देशातील १८ केंद्रांमध्ये जातात. रोज दोन- तीन वॅगन नोटा रवाना होतात.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!