Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiUnlockUpdate : पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या खाली आला तरी मुंबईत निर्बंध कायम , महापालिकेचा निर्णय

Spread the love

मुंबई : मुंबई शहरात करोना पॉझिटिव्हिटी रेट ५ टक्क्यांच्या खाली आला असला तरी मुंबई तूर्त लेव्हल ३ मध्येच राहणार असल्याची माहिती मुंबई महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान राज्य शासनाने अनलॉक प्रक्रिया राबविताना राज्यात पाच स्तरात शहरांची विभागणी करण्याचे अधिकार महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. दरम्यान या नियमानुसार मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. मात्र असे  असले  तरीही मुंबईत निर्बंध आणखी शिथिल केले जाणार नाहीत. त्यामुळे  मुंबई महानगरपालिकेने  जारी केलेल्या नियमानुसार  मुंबईत लेव्हल ३ नुसारच आधीचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

या निर्णयामागे शहरातील लोकसंख्या हे मुख्य कारण असून याशिवाय  शहरातील दाट लोकसंख्या, लोकलमध्ये होणारी गर्दी आणि  हवामान विभागाकडून देण्यात आलेला अतिवृष्टीचा इशारा या कारणांचाही समावेश आहे.

दरम्यान,  नवा आदेश येईपर्यंत आधीचे नियम कायम राहतील, असे  प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे लोकल सेवा सर्वसामान्यांसाठी खुली होईल, अशी आशा बाळगणाऱ्यांच्या पदरी निराशा पडली असून मुंबई शहरात इतर निर्बंध नेमके कधी खुले होतात, यासाठी मुंबईकरांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!