Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : पंतप्रधानांकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक

Spread the love

मुंबई:  राज्य सरकारकडून कोरोनावर मात करण्यासाठी  करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी ‘कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी महाराष्ट्र चांगली लढाई लढत आहे’ अशा शब्दांत कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करीत असलेल्या  प्र्यत्नांबद्धल आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली तसेच दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे, असे  सांगितले .

यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे, अशी विनंती केली व विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसे नियोजन करीत आहोत, त्याविषयीही मुख्यमंत्री बोलले. दरम्यान पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करीत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होतो आहे, महाराष्ट्राच्या काही सूचना  केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. तसेच, राज्यातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी तात्काळ लसींचा पुरवठा करण्याची मागणीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यांत ऑक्सिजनची कमतरता आजही जाणवत आहे. त्यासाठी इतर राज्यांतून ऑक्सिजनचा पुरवठा तात्काळ राज्याला मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. त्याचबरोबर राज्याला विदेशातून लस आयात करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांकडे केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!