Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : अरे रे हे काय झाले ? ममतांचा हात धरलेल्या सुजाता यांचा हात कायमचा सोडण्याची भाजप खासदार पतीची धमकी…

Spread the love

भाजपा खासदार सौमित्र खान  यांच्या पत्नीने १० वर्षाच्या सोबतीची परवा न करता तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच पत्नीच्या या कृत्यावर संतापलेल्या भाजपा खासदार पती महोदयांनी पत्नीला थेट घटस्फोट देण्याची धमकी दिली आहे. सध्या पश्चिम बंगालमध्ये पक्षांतराचे वारे वाहत आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱ्यापासून याची सुरूवात झाली असून पक्षांतराच्या या लाटेचा प्रभाव भाजपाचे खासदार सौमित्र खान यांच्या पत्नी सुजाता मोंडल खान यांच्यावर पडल्यानंतर त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. सुजाता मोंडल खान यांनी भाजपातून बाहेर पडत ममतांचा हात धरणे त्यांच्या पतीला पडले असते तरच नवल !! आता या धमकीचा सुजाता यांच्यावर किती परिणाम होईल याचे उत्तर त्या स्वतःच देतील.

दरम्यान पत्नी सुजाता मोंडल यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचे समजल्यावर संतप्त  खासदार सौमित्र खान यांनी सुजाता यांना थेट घटस्फोट देण्याची धमकी दिली. भाजपाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळणारे खान पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले,”मी तिला पूर्ण स्वातंत्र्य दिलं. माझी तिला विनंती आहे की, माझं आडनाव लावू नकोस. तुझ्या नावासमोरील खान आडनाव काढून टाक. ते तुझे अधिकार कापून टाकतील. त्यांनी तुझ्यावर हल्ला करण्याची धमकी दिली होती. आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर असताना तुझा जॉब ममता बॅनर्जींनी हिरावून घेतला होता. मी माझं वचन पाळलं. मी तुला उभं केलं. निम्मा पगार तुझ्या खात्यावर जमा केला. कारण तुला पैसे मागायला लागू नये म्हणून आणि आता ज्यांनी तुला भूतकाळात दुःख दिलं, त्यांच्याशी तू हातमिळवला आहेस,” असं बोलताना खान यांचे डोळे भरून आले.

“भाजपानं मला ओळख मिळवून दिली. भाजपाशिवाय मी कुणीच नाही. हे खरं आहे की तू माझा प्रचार केला, पण मी भाजपाच्या नावाशिवाय जिंकू शकलो नाही. प्रत्येक घरात भांडणं होतात. पण महत्त्वकांक्षा जपण्यासाठी तू कुटुंबापेक्षा राजकारण निवडले आहेस. तू अडकली आहेस, तुझी खूप मोठी चूक झाली आहे,” असं सांगत खान यांनी घटस्फोट देणार असल्याची माहिती दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!