Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldCoronaEffect : धक्कादायक : कोरोनाने घेतला पंतप्रधानांचा बळी !!

Spread the love

कोरोनाचा कहर जगभर चालूच असून आफ्रिका खंडातील इस्वाटिनी देशाचे पंतप्रधान एम्बोरोसे डलामिनी ( ५२ )  यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असल्याचे धक्कादायक वृत्त आहे. तब्बल महिनाभर त्यांनी कोरोनाशी झुंज दिली. मात्र त्यांचा हा लढा अपयशी ठरला.  दालमिनी यांना चार आठवड्यांपूर्वीच कोरोनानं विळखा घातला होता. दक्षिण आफ्रिकेतील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. एक डिसेंबरपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. पण त्यांचा हा लढा ते हरले. रुग्णालयातच रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इस्वाटिनीचे उपपंतप्रधान थेंबा मसुकू यांनी त्यांच्या निधनाचं वृत्त दिलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती त्यांनी दिली.

रॉयटर्सनं दिलेल्या वृत्तानुसार थेंबा मुसकू यांनी सांगितलं, पंतप्रधान एम्बोरोसे डलामिनी यांच्या निधनाची वार्ता नागरिकांना देण्याच्या सूचना राजपरिवाराकडून मिळाल्या आहेत.  रविवारी दुपारी दक्षिण आफ्रिकेतील रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. एक डिसेंबरला डालमिनी यांना जेव्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत होते. मात्र त्यांची कोरोनाशी झुंज अपयशी ठरली. नोव्हेंबर 2018 मध्ये दालमिनी यांच इ्स्वाटिनीच्या पंतप्रधानपदी निवड झाली होती. त्यांनी बँकिंग क्षेत्रातही अठरा वर्षांपेक्षा अधिक काळ काम केलं आहे. इ्स्वाटिनी नेडबँक लिमिटेडमध्ये ते व्यवस्थापकीय संचालक होते. इस्वाटिनी हा दक्षिण आफ्रिकेतील छोटासा देश आहे.  १.२ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या दक्षिण आफ्रिकेतील या देशात ६, ७६८ कोरोना रुग्ण आहेत. १२७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!