Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

GujratNewsUpdate : ट्रक -कारच्या भीषण अपघातात दोन लहान मुलांसह ७ जणांचा होरपळून मृत्यू , देव दर्शनाहून घरी परतताना काळाने घेरले !!

Spread the love

गुजरात मधील सुरेन्द्रनगर जिल्ह्यात ट्रक आणि कारच्या धडकेत झालेल्या भीषण अपघातात ७ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याचे वृत्त आहे पाटडी भागातील  राम पीर मंदिराजवळ हा अपघात झाला असल्याची माहिती सुरेंद्रनगर जिल्ह्याचे पोलिस उपअधीक्षक एचपी दोशी यांनी दिली आहे. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार अपघातातील ट्रकने कारला धडक दिल्याने  या अपघातात कारने पेट घेतल्यामुळे सातही  प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. हा अपघात इतका भयानक होता पुरुष आणि महिलांची संख्या आणि ओळख पटणेही कठीण झाले आहे.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाटडी जिल्ह्यातील वरही तालुक्यातील कोयदा या गावातील कुटुंबीय चोटीला मंदिरात दर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपल्यानंतर ते आपल्या घराकडे येत असताना हा भीषण अपघात झाला . या अपघातामध्ये दोन मुलांचा समावेश असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कारमध्ये गॅस किट होती त्यामुळे आग लागण्याची शक्यता असून अधिक तपास चालू आहे. या अपघातातील कुटुंबियांची सविस्तर माहिती अद्याप मिळाली नसल्याचे दोशी यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!