Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

WorldNewsUpdate : बदलत्या काळानुसार युएईने केले आपल्या इस्लामिक कायद्यात “हे” महत्वपूर्ण बदल

Spread the love

इस्लामिक कायद्याचे कडक पालन करणाऱ्या संयुक्त अरब अमिरातीने बदलत्या काळाबरोबर स्वतःच्या कायद्यात बदल करीत मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला असल्याचे वृत्त आहे . युएईने इस्लामिक पर्सनल लॉमध्ये मोठे बदल केले आहेत. त्यामुळे आता संयुक्त अरब अमिरातीमध्ये लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहता येणार आहे. त्याशिवाय मद्य सेवनावरील निर्बंध शिथील करण्यात आले असून ऑनर किलिंगच्या प्रकरणांनाही आता नव्या कायद्यानुसार गुन्हा समजला जाणार आहे.

शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या नियमांनुसार, आता युएईमध्ये मद्याबाबतच्या नियमांतही शिथिलता आणण्यात आली आहे. वय वर्षे २१ हून अधिक असलेल्या व्यक्तींना मद्य सेवन करण्यास, बाळगण्यास अथवा विक्री केल्यास दंडात्मक कारवाई होणार नाही. याआधी मद्य खरेदी करणे, त्याची वाहतूक करणे, घरात ठेवण्यासाठी परवाना घेणे आवश्यक होते. नव्या नियमांनुसार, ज्या मुस्लिमांवर मद्यसेवन करण्यास निर्बंध होते, त्यांना परवानगी देण्यात आली आहे. तसेच लग्नाशिवायही जोडप्यांना एकत्र राहण्यास परवानगी देण्यात आली आहे. युएईमध्ये याआधी ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा गंभीर गुन्हा होता.  दरम्यान  दुबईमध्ये हा नियम परदेशी नागरिकांसाठी प्रशासनाकडून शिथिल होता. मात्र, शिक्षा होण्याचा धोका कायम होता.

या कायद्याशिवाय ऑनर किलिंगच्या प्रकरणाबाबतही सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ऑनर किलिंग करणाऱ्या व्यक्तीला संरक्षण देणाऱ्या नियमात बदल करण्यात आले आहेत. जुन्या कायद्यानुसार, आपल्या घराची, कुटुंबाची प्रतिष्ठा धुळीस मिळवत असल्याच्या कारणाने एखाद्याने घरातील महिलेची हत्या केल्यास त्याला कायद्याचे संरक्षण होते. इस्लामिक पसर्नल लॉमध्ये केलेले हे बदल अमिरातीमधील शासकांनी बदलत्या काळानुसार उचललेली पावले असल्याचे समजले जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!