Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaCoronaUpdate : काय देशातील कोरोनाची परिस्थिती ? कोरोनाचे रुग्ण वाढले कि कमी झाले ?

Spread the love

केंद्र सरकारकडून देशातील कोरोना संसर्गाचा वेग कमी होत असून उपचारदर वाढत असल्याचे सांगितले जात असले, तरी देखील नवीन कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे . शिवाय, कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येतही भर पडतच आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात ५० हजार १२९ नवे करोनाबाधित आढळले असून, ५७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ७८ लाख ६४ हजार ८११ वर पोहचली आहे.

दरम्यान देशभरातील एकूण ७८ लाख ६४ हजार ८११ करोनाबाधितांच्या संख्येत ६ लाख ६८ हजार १५४ अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले ७० लाख ७८ हजार १२३ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १ लाख १८ हजार ५३४ जणांच्या संख्येचा समावेश आहे. २४ ऑक्टोबर पर्यंत देशात १०,२५,२३,४६९ नमूने तपासण्यात आले आहेत. तर, यातील ११ लाख ४० हजार ९०५ नमून्यांची काल तपासणी झाली आहे. आयसीएमआरच्या हवाल्याने हे वृत्त देण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!