Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaEducationUpdate : केंद्र सरकारकडून शाळा सुरु करण्यास संमती पण दिला हा महत्वाचा निर्णय…

Spread the love

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नव्या निर्णयानुसार आणि मार्गदर्शक नियमानुसार  विविध राज्यात १५ ऑक्टोबरपासून टप्प्याटप्प्याने देशातील शाळा सुरु करण्यास संमती दिली आहे. मात्र शाळा सुरु करण्याचा निर्णय झाला असला तरीही हा निर्णय सक्तीचा नाही. राज्यातील परिस्थितीनुसार राज्यं याबाबत निर्णय घेऊ शकतात असे आदेशात म्हटले आहे.  या निर्णयानुसार आधी मोठ्या वर्गाच्या आणि मग हळूहळू लहान वर्गांच्या शाळा सुरु करण्यात येतील. शाळा सुरु करण्याबाबतची मानक कार्यप्रणाली (SOP) हे राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी ठरवायचं आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळणं आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची आणि आरोग्याची काळजी घेणं ही राज्यांची शाळांची जबाबदारी आहे असेही या संबंधीच्या आदेशात  स्पष्ट करण्यात आलं आहे. तसंच जो माध्यान आहार दिला जातो तो स्वच्छ, सुरक्षित असेल याचीही जबाबदारी राज्यांची आणि शाळांची असणार आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी या आदेशासंदर्भात स्पष्ट केले आहे कि , ज्या शाळा सुरु करण्यात येतील त्यांनी कोरोनाचा  संसर्ग रोखण्यासाठी  राज्याच्या मार्गदर्शक सूचनांचं काटेकोर पालन करणं आवश्यक आहे. शाळा सुरु करण्याचा निर्णय झाला असला तरीही हा निर्णय सक्तीचा नाही. राज्यातील परिस्थितीनुसार राज्यं याबाबत निर्णय घेऊ शकतात. शाळा सुरु झाल्यानंतर किमान २ ते ३ आठवडे मुलांना गृहपाठ देऊ नये. मुलांचे मनःस्वास्थ योग् राहिल याची काळजी घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. तसंच शाळांनाही स्वच्छता आणि कोविड सुरक्षा नियम काटेकोरपणे पाळणे आवश्यक आहे असे पुन्हा पुन्हा नमूद करण्यात आले आहे.

मानक कार्यप्रणालीनुसार अशी आहे नियमावली

पालकांची लेखी संमती असेल तरच विद्यार्थी शाळेत येऊ शकतात

विद्यार्थ्यांना नियमित उपस्थित रहावेच लागेल याची सक्ती नाही .

ऑनलाइन शिक्षण पद्धतीचा अधिकाधिक अवलंब करण्यात यावा.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!